दीनदुबळ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा : वाकळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 26, 2021

दीनदुबळ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा : वाकळे

 दीनदुबळ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा : वाकळे

आठरे पाटील वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः दीनदुबळ्यांची सेवा ईश्वर सेवा समजून प्रत्येकाने सकारात्मक दृष्टीकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासावी. आ. अरुणकाका जगताप यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आम्ही वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवित असतो. देवाने आपल्याला मनुष्याचे जीवन दिले आहे. त्याचा उपयोग समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी केला गेला पाहिजे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून आपले कर्तव्य पार पाडावे. कोरोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये आ. अरुणकाका जगताप यांचा वाढदिवस गर्दी न करता सामाजिक उपक्रमांनी साजरे करण्याचा निर्णय घेतल्यानुसार एमआयडीसीतील आठरे पाटील अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. या वस्तीगृहाला शासनाचे कुठलेही फंड उपलब्ध नाही. यासाठी प्रत्येकाने विद्यार्थ्यांच्या जीवन घडणीसाठी आपले योगदान द्यावे, असे प्रतिपादन नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी केले.
आ.अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त एमआयडीसीतील आठरे पाटील अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक कुमारसिंह वाकळे, डॉ. सागर बोरुडे, गोरक्षनाथ सांगळे, मुन्ना शेख, प्रशांत बेलेकर, जावेद सय्यद, सुनील साळवे, पंकज लोखंडे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. सागर बोरुडे म्हणाले की, दीनदुबळे आणि गरजू लोकांना मदत करणे, हे प्रत्येक सुजान नागरिकाचे कर्तव्य आहे. सामाजिक बांधिलकीतून प्रत्येकाने त्यांना मदत करणे गरजेचे आहे. यातून आपण माणुसकीचे दर्शन घडवू शकतो. आ. अरुणकाका जगताप यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांतून साजर करण्यात आल्याचे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment