नगरमध्ये बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 5, 2021

नगरमध्ये बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

 नगरमध्ये बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व नगरमधील आंजनेय प्रतिष्ठानच्यावतीने दि.11 मार्च 2021 पासून वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलात बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा 16 वर्षाखालील संघांची स्पर्धा होणार आहे. लेदर बॉलवर होणार्या या स्पर्धेतहल सर्व सामने प्रत्येकी 40 षटकांचे होतील. स्पर्धा नॉक आऊट (बाद) पध्दतीने खेळवली जाणार आहे. जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने सलग चौथ्या वर्षी ही स्पर्धा घेण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आ.अरूणकाका जगताप व आंजनेय प्रतिष्ठानचे संदीप पवार यांनी दिली.
स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना अरूण नाणेकर व डॉ.राहुल पवार यांनी सांगितले की, कै.बाळासाहेब पवार हे स्वत: उत्तम गोलंदाज व फलंदाज होते. क्रॉम्प्टन कंपनीत इंजिनीयर म्हणून काम करतानाच त्यांनी क्रिकेटची आवडही जोपासली होती. कूचबिहार, सी.के.नायडू या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या तसेच पश्चिम विभागीय संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. अहमदनगर जिल्हा संघाचे कर्णधारपदही त्यांनी भूषविले होते. नगरमध्ये दरवर्षी होणार्या क्रॉम्प्टन करंडक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनातही सलग 23 वर्षे त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. क्रिकेटप्रती प्रचंड प्रेम असल्याने नवोदित खेळाडूंसाठी ते हक्काचे मार्गदर्शक होते. नगरमध्ये खेळाडू, पंच यांच्यासह स्कोअररसाठीही त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन शिबिरे घेतली. नगर जिल्ह्यातून दर्जेदार खेळाडू तयार व्हावेत, त्यांना विविध स्पर्धांतून आपले कौशल्य सादर करता यावे यासाठी त्यांनी सातत्याने काम केले. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघास रोख पारितोषिके व चषक देवून गौरविण्यात येईल. या स्पर्धेचा नगरकर क्रिकेटप्रेमींनी लाभ घेण्याचे आवाहन कपिल पवार (9765550535), जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे प्रा.माणिक विधाते व गणेश गोंडाळ यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here