राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलतं करावं - देवेंद्र फडणवीस. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 24, 2021

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलतं करावं - देवेंद्र फडणवीस.

 राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलतं करावं -  देवेंद्र फडणवीस.


मुंबई ः
ज्या प्रकारच्या घटना गेल्या काही दिवसात बाहेर येतात. हे अत्यंत चिंताजनक आहे. या घटनांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मौन हे चिंताजनक आहे. शरद पवारांनी दोन प्रेस घेतल्या. पण त्यांनी पाठीशी घालण्याचे काम केले. तर काँग्रेस अस्तित्वहीन आहे. त्यांची काहीही भूमिका नाही. त्यांचे नेते दिल्लीत एक आणि इथे वेगवेगळं बोलतात, महाविकासआघाडीने सर्व नैतिकता पायाखाली तुडवली आहे. केवळ सत्तेसाठी या ठिकाणी हे सर्व काम चाललं आहे. त्यापलीकडे काहीही नाही,  मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यापालांनी बोलत करावं. खंडणीच्या घटनेत काय कारवाई केली? याबाबतचा अहवाल घेतला पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे आज केली. भाजपचे शिष्टमंडळ मुंबईतील राजभवनात आज सकाळी दाखल झाले. यानंतर त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. भाजपच्या या शिष्टमंडळात देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा हे नेते सहभागी आहेत. जवळपास तासाभर भाजपचे शिष्टमंडळ आणि राज्यपालांची खलबतं सुरु होती. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत महाविकासआघाडी सरकारवर टीका केली.राज्यात सध्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, सचिन वाझे प्रकरण, परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात केलेले आरोप या सगळ्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट होत्या असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता यावरुन आता देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. जर कोणत्या अधिकार्‍याने खरे सांगितले तर तो भाजपचा एजंट ठरतो आणि जर हफ्ता वसूली केली तर तो काय शिवसेनेचा एजंट आहे का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जर तो लवंगी फटका होता की मोठा बॉम्ब, हे लवकरच समोर आले. जर 25 ऑगस्ट 2020 पासून तो इतके दिवस का दाबून ठेवला कोणाचे चेहरे बाहेर येणार होते. नेमकं कोण यात लिप्त आहेत. त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही दाबून ठेवला. संजय राऊतांकडे फार वेळ आहे. ते काही एवढे मोठे नाहीत. की त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे द्यायला हवीत, असेही फडणवीस म्हणाले.

No comments:

Post a Comment