पवारांवरील शस्त्रक्रिया यशस्वी. चार दिवसांनी डिस्चार्ज.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 31, 2021

पवारांवरील शस्त्रक्रिया यशस्वी. चार दिवसांनी डिस्चार्ज..

 पवारांवरील शस्त्रक्रिया यशस्वी. चार दिवसांनी डिस्चार्ज..

रात्री ऑपरेशन! सकाळी पेपर वाचन.


मुंबई ः
राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवारांवर काल रात्री गॉलब्लॅडरची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली नी सकाळीच शरद पवार यांनी वृत्तपत्राचे वाचन सुरू केले. कितीही बिझी असले तरी रोज सकाळी वृत्तपत्रांचे वाचन करणे हा पवारांचा आवडता छंद आहे. आज सकाळीच त्यांनी राज्यातील, देशातील वृत्तपत्रे मागवुन ती वाचून काढली.
शरद पवारांना पित्ताशयाच्या खड्यामुळे पोटदुखीचा त्रास होत होता. त्यामुळेच नियोजित वेळेपेक्षा एक दिवस आधीच पवारांवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय ब्रीच कँडीच्या डॉक्टरांच्या टीमने घेतला. पवारांवर येत्या चार दिवसात ब्रीच कँडीमधून डिस्चार्ज मिळेल अशी माहिती आहे. तर पवारांचे पित्ताशय काढून घेण्याचा निर्णय हा येत्या दोन आठवड्यात घेण्यात येणार असल्याचे कळते.
काल रात्री 11 वाजताच ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, पित्तनलिकेतील स्टोन शस्त्रक्रिया करुन काढण्यात आला असून शरद पवारांना तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे. शरद पवारांवर यांच्यावर ब्रीच कँडीत शस्त्रक्रिया कऱणार्‍या टीममध्ये डॉ मायदेव, डॉ गोलावाला, डॉ दफ्तरी, डॉ समदानी, डॉ तिब्रेवाला या डॉक्टरांची टीम होती. तर कुटूंबीयांपैकी स्वतः सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि अजितदादा पवार हे ब्रीच कँडी येथे उपस्थित होते.
शरद पवारांच्या तब्बेतीबाबत सगळेजणच काळजी करत होते. ’ब्रीच कँडी’ हॉस्पिटलमध्ये आदरणीय साहेबांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून पित्ताशयातील खडे काढण्यात आले. सर्वांनाच काळजी वाटत असली तरी साहेबांची प्रकृती सुधारत असून त्यांना लवकर आराम मिळेल. शस्त्रक्रिया करणारे डॉ. मायदेव आणि त्यांच्या इतर सर्व सहकार्‍यांचे मनापासून आभार! शस्त्रक्रियेनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेसह आम्ही पवार साहेबांची भेट घेतली. टोपे साहेबांना पाहून पवार साहेबांनी त्यांच्याकडून इतर विषयांसह राज्यातील कोरोनाच्या स्थितीची माहिती घेतली. हॉस्पिटलमध्ये असतानाही राज्याची काळजी करणार्‍या या लोकनेत्याला पाहून तर मी थक्क झालो! - आमदार रोहित पवार.
ब्रीच कॅडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर परिचारिका व सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय पवार साहेब त्याचं रोजचं सर्वात आवडते काम वृत्तपत्रांच वाचन करीत आहेत - खासदार सुप्रिया सुळे

No comments:

Post a Comment