भांडुप मॉलला आग; रुग्णालयातील दहा 10 जणांचा होरपळून मृत्यू. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 26, 2021

भांडुप मॉलला आग; रुग्णालयातील दहा 10 जणांचा होरपळून मृत्यू.

 भांडुप मॉलला आग; रुग्णालयातील दहा 10 जणांचा होरपळून मृत्यू.


मुंबई :
भांडुपच्या ड्रीम्स मॉलला लागलेली भीषण आग अद्यापही धुमसत आहे. मॉलच्या तिसर्‍या मजल्यावर असलेलं सनराईज रुग्णालय देखील या आगीच्या विळख्यात सापडले आहे. रुग्णालयातील 10 रुग्णांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. या रुग्णालयातील 69 रुग्णांची सुटका करण्यात आली. काही रुग्णांचा अद्यापही शोध सुरु आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने भांडुप आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
अग्निशमन दलाचे 23 ते 24 बंब सध्या घटनास्थळी दाखल झालेत. मॉलमधली अनेक कार्यालय  बंद अवस्थेत असल्यामुळे ही आग  मोठ्या प्रमाणात भडकली. मोठ्या प्रमाणात फर्निचरने पेट घेतल्याने परिसरात धुराचं साम्राज्य आहे. आग विझवताना मॉलमध्ये अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत नसल्यामुळे अनेक अडचणींना अग्निशमन दलाच्या जवानांना सामोर जावे लागले आहे. दरम्यान या आगीच्या घटनेमुळे गांधीनगर ते भांडुप एलबीएस मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक द्रुतगती मार्गाच्या दिशेने वळविण्यात आली आहे. ड्रीम मॉलमध्ये काल रात्री भीषण आग लागली. त्याच मॉलच्या तिसर्या मजल्यावर सनराइज हॉस्पिटल आहे. आगीचा भडका उडाला आणि पाहता पाहता हॉस्पिटललाही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 हून अधिक वाहने घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात आग लागली. त्यावेळी सुमारे 70 ते 75 रुग्ण दाखल करण्यात आलेले होते. यातील बहुतेक रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरु होते. अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांच्या मदतीने सर्व रुग्णांना शिडीच्या मदतीने एक-एक करून रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना जवळच्या कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले आहे. आगीची माहिती  मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांना माहिती जाणून घेतली. किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आमची प्राथमिकता आता आग विझविणे आहे. आग कशी लागली, त्याचे कारण काय आहे, याची चौकशी का केली जाईल. या संपूर्ण प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. दरम्यान, आग दुसर्‍या दिवशीही धुमसत होती. आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
कोविड रुग्णसंख्या वाढत असल्याने या कोविड सेंटरला परवानगी देण्यात आली होती. 31 मार्चला ही मुदत संपणार होती. वेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना स्थलांतरित करण्यासाठी वेळ लागला, आणि त्यात काही रुग्णांचा मृत्यू झाला, अशा दुर्घटना घडू नये, म्हणून याआधीच सूचना देण्यात आलेल्या आहेत, की जिथे जिथे आरोग्य व्यवस्था उभारण्यात आलेली आहे, तिथले स्ट्रक्चरल ऑडीट करा. त्यामुळे अशा घटना का घडतायत, याबाबत पुन्हा चाचपणी केली जाईल. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईल, आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारतर्फे 5 लाखांची नुकसानभरपाई देण्यात येईल - उद्धव ठाकरेंनी, मुख्यमंत्री.

No comments:

Post a Comment