नेवासे तालुकाध्यक्षपदी शिंदे यांची दुसर्‍यांदा नियुक्ती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 31, 2021

नेवासे तालुकाध्यक्षपदी शिंदे यांची दुसर्‍यांदा नियुक्ती

 नेवासे तालुकाध्यक्षपदी शिंदे यांची दुसर्‍यांदा नियुक्ती


नगरी दवंडी/प्रतिनिधी
माका ः पक्ष संस्थापक महादेवजी जाणकर यांच्या आदेशानुसार,राष्ट्रीय समाज पक्षाच्या झालेल्या अहमदनगर येथील आढावा बैठकीत जिल्ह्यातील जिल्हानिहाय तसेच तालुकेनिहाय कार्यकारीणी पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी शरद सबाजी बाचकर यांच्या मार्गदर्शनाखाली,तसेच उत्तर जिल्हाप्रभारी नानाभाऊ जुंधारे,दक्षिण जिल्हाप्रभारी गंगाधर कोळेकर,शिर्डी लोकसभा अध्यक्ष संभाजी लोंढें यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर केली असता,जिल्ह्यातील नवनिर्वाचित पदाधिकारयांच्या नियुक्तया करण्यात आल्या असुन,यामध्ये नेवासे तालुका अध्यक्षपदी दत्तात्रय शिंदे यांची दुसरयांदा नियुक्ती करण्यात आली आहे.                        
याबाबत असे की,महादेवजी जाणकर यांच्या आदेशाने,आगामी काळातील निवडणुकांसंदर्भातील ध्येय धोरणानुसार,जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन पक्षाच्या वतीने,आय.टी.पार्क एम.आय.डि.सी.अहमदनगर या ठिकाणी केले गेले.या आढावा बैठकीचे अध्यक्ष सलीम बाबा शेख यांच्या अध्यक्षतेखाली,नवनिर्वाचित पदाधिकारयांच्या नियुक्तया करण्यात आल्या.याचबरोबर जिल्ह्यातिल इतर तालुक्यात अदलाबदल्या केल्या असुन, नेवासे तालुक्यात दुसरयांदा शिंदे यांची पक्षश्रेष्ठीने, पक्षासंबधीचा विश्वास, आदर, निष्ठा, आदेशाचे पालन, तालुक्यातील पक्षसंघटनेच्या वतीने सहकार्यातुन केलेल्या कामाची पावती म्हणुन आय.टी.पार्क एम.आय.डि.सी. अहमदनगर या ठिकाणी नियुक्ती केली.                                                  
याअगोदर तालुक्यात पक्ष संघटनेच्या सहकार्याने पक्षाच्या ध्येयधोरणानुसार वेळोवेळी, सर्वसामान्यांच्या प्रश्नासंबधी, शेतकरीहीत निर्णयासंबधी, दुधदरवाढ, विज, पिकपाणी, रस्ते, यासंदर्भात आंदोलने, उपोषणे करुन प्रशासनास वेळोवेळी निवेदनं देवून जागं करण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून, आदेशानुसार केले गेले. यापुढेही तालुक्यात पुर्वीपेक्षा पक्षसंघटन अधिक मजबूत करुन, तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पक्षाचे विचार पोहोचवण्याचे काम तसेच प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून कायमच कटीबद्ध राहणार असुन, पक्षाच्या आदेशानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात लवकरच रासप तालुका कार्यकारीणी जाहीर करुन नवनिर्वाचित पदाधिकारयांच्या नियुक्तया केल्या जातील असे शिंदे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment