खर्ड्यातील स्वच्छता लोकसहभागातून बनली लोकचळवळ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 8, 2021

खर्ड्यातील स्वच्छता लोकसहभागातून बनली लोकचळवळ

 खर्ड्यातील स्वच्छता लोकसहभागातून बनली लोकचळवळ  


नगरी दवंडी/प्रतिनिधी
खर्डा ः बारामती ऍग्रो च्या विस्वस्त सौ.सुनंदाताई पवार यांच्या संकल्पनेतून स्वच्छते विषयी मार्गदर्शनातून आ.रोहितदादा पवार विचार मंचाची स्थापना करण्यात आली त्या माध्यमातून आतापर्यंत निवडक सहकार्‍यांना घेऊन प्रत्येक गल्लीत स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे त्याला आता मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.
दि.7 मार्च रोजी खर्डा येथील कोष्टी गल्लीत विचार मंचाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली सर्व गल्लीतील जवळपास एक ट्रॅक्टर कचरा गोळा करण्यात आला. यासाठी गल्लीतील पुरुष महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते. त्यामुळे खर्डा शहरातील स्वच्छता ही खरी लोकचळवळ होत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
या स्वच्छता मोहिमेत उपसरपंच सौ.रंजना लोखंडे, सौ. नीताताई पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य सौ.शितल शिंदे, सौ. जयश्री साळुंके, सौ. पूजा साळुंके, सौ.कल्याणी साळुंके, चिरंजीव दिव्यानी साळुंके, माजी पंचायत समितीचे सदस्य विजयसिंह गोलेकर, श्रीकांत लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर, सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत गोलेकर, शशीकांत गुरसाळी, ससाणे साहेब, आ. रोहितदादा पवार विचार मंचाचे अध्यक्ष दत्तराज पवार, विकास शिंदे, बापूसाहेब ढगे, अवि सुरवसे, भीमा घोडेराव, धनसींग साळुंके, गोटू आहेर इ, सह कार्यकर्ते उपस्थित होते,
त्यानंतर चोंडेश्वरी नवरात्र उत्सव मंडळाच्या जेष्ठ मार्गदर्शक सुनील साळुंके यांच्या वतीने स्वच्छता अभियानात सहभागी असनार्‍यांचे यावेळी सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here