परिसरातील गावांनी ठराव दिल्यास नागरदेवळ्याला नगरपालिका करू ः तनपुरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 15, 2021

परिसरातील गावांनी ठराव दिल्यास नागरदेवळ्याला नगरपालिका करू ः तनपुरे

 परिसरातील गावांनी ठराव दिल्यास नागरदेवळ्याला नगरपालिका करू ः तनपुरे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
केडगाव ः नागरदेवळे परीसर शहराला लागून आहे . या भागात शहरीकरण झाले मात्र ग्रामपंचायतीमध्ये हे गाव असल्यामुळे पुरेसा निधी नसल्यामुळे नागरी सुविधेचा अभाव आहे . हा भाग विकास कामापासून दुर्लक्षीत आहे. या परीसरातील गावानी नगरपालिका करण्याचा ठराव दिला तर नगर पालिका करू .नगर पंचायत खाते आपल्याकडे असल्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी आणता येईल.नागरी सुविधा मिळतील असे प्रतिपादन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले .  
नागरदेवळे ( ता. नगर ) येथे आलमगीर , पिंपळगाव उज्जन्नी येथे रस्त्याच्या कामाचा शुंभारभ प्रसगी ते बोलत होते . या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे,गोविद मोकाटे, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भगत, अमोल जाधव , रोहिदास कर्डीले, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष ऊध्दवराव दुसुंगे, केशव बेरड, कानीफनाथ वाघ , राहुल आल्हाट ,सिताराम काकडे, रघुनाथ झिने ,महेश झोडगे,संतोष धाडगे, सावता धाडगे, देवराच भालसिंग  संभाजी भगत, मंजाबापु घोरपडे, भिमराज मोकाटे, अँड अभिषेक भगत ,विलासराव काळे, ऊस्माणभाई  सय्यद अदी उपास्थित होते . यावेळी तनपुरे म्हणाले नागरदेवळे , वडारवाडी परीसरातील गावे शहरालगत आहे. या भागात चांगल्या प्रकारे शहरीकरण झाले आहे . नगर विकास खाते आपल्याकडे आहे. या भागात ग्रामपंचायत आहे . या भागातील समस्या सोडविण्यासाठी नगर परीषद आपण करू शकतो . तशी कार्यवाही हि सुरु केली आहे. ग्रामपंचायत ने पांठीबा दिला तर नगर पालिका स्थापन करू शकतो . राज्यमंत्री असल्यामुळे नगर पालिकेच्या वेगवेगळ्या योजना आणता येतील . घनकचरा , घंटागाडी, कचरा प्रक्रिया , पाणी योजना , भूमिगत गटार .ग्रामीण विकास विभागापेक्षा जास्त निधी मिळू शकतो . शहरीकरण झालेल्या भागाचा विकास नगर पालिके झाली तर लवकर होऊ शकतो . मात्र या भागातील काही लोक गैरसमज पसरविण्याचे काम करतील . नगर तालुक्यातील सर्वच रस्त्याची दुरावस्था झाली आहे .पोखर्डी ते पिंपळगाव उज्जनी हा पाच कि मी रस्ता भाजपाच्या काळात मुख्यमंत्री सडक योजनेतून दिड कोटी रुपये खर्च करून करण्यात आला . अवघ्या सहा महिन्यात या रस्त्याची चाळण झाली . या रस्त्याबाबत संबधीत अधिकार्‍यांना तनपुरे यांनी चांगलेच धारेवर धरले .पंधरा दिवसाच्या आत या रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर संबधीत अधिकार्‍यावर कार्यवाही करण्यात येईल असे सांगीतले .विळद परिसर सोडला तर नगर तालुक्यात कुठेही  ऊस नाही मात्र बुर्‍हानगर मध्ये ऊस कोणत्या पाण्यावर आला याची चौकशी केली असता वॉल मधून कनेक्शन घेऊन शेती ला पाणी दिले असे समजले . शेतीसाठी मुख्य जलवाहिनी मधून पाणी घेऊन शेती करणारे नेते असतील सर्वांना पाणी कसे मिळणार हा संशोधन चा विषय ठरणार . या पाण्याबाबत तक्रारी आल्या पंचनामा झाला मात्र कार्यवाही झाली नाही . या पाण्याबाबत जिल्हा परिषद अधिकार्‍याना सांगून जलवाहीना चा बंदोबस्त करायला लावणार असे तनपुरे यावेळी म्हणाले .
यावेळी सागर वाघ , शंकर आढाव , सुभाष वाघ , दिपक आल्हाट, आदेश वाघ , भाऊ वाघ , भानुदास मुळे  , पवन वाघ , गोरख वाघ , पप्पू वाघ , शिवाजी वाघ , बापू वाघ , दादा वाघ , रेवण वाघ , अरुण आढाव , सिताराम. आल्हाट , अमोल आल्हाट , मुराद शेख ,लाला शेख, मुसाभाई शेख आदी उपस्थित होते .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here