जिल्हाधिकार्‍यांनी दिला गगनगिरी महाराजांच्या सान्निध्यातील आठवणींना उजाळा ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 19, 2021

जिल्हाधिकार्‍यांनी दिला गगनगिरी महाराजांच्या सान्निध्यातील आठवणींना उजाळा !

 जिल्हाधिकार्‍यांनी दिला गगनगिरी महाराजांच्या सान्निध्यातील आठवणींना उजाळा !


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीक्षेत्र कोरठण ः महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत आणि राज्यस्तरीय ’ब’ वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर या देवस्थानला अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी दुपारी 2 वा. भर उन्हात अचानक भेट दिली त्यांच्या समवेत श्रीगोंदा-पारनेर विभागाचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले होते.
डॉ भोसले यांनी येथील मुख्य मंदिरातील खंडोबाची स्वयंभू मूर्ती व त्यापुढील स्वयंभू 12 लिंगाचे दर्शन मनोभावे घेऊन, आरती घेऊन देवस्थान परिसर पाहणी केली देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड पांडुरंग गायकवाड यांनी देवस्थानच्या विकास कामांची तसेच देवस्थानचे पौराणिक महात्म आणि प. पु. गगनगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते देवस्थानचा झालेला सन (1997 साली) जीर्णोद्धार याविषयी माहिती सांगितली. गगनगिरी महाराजांचा देवस्थानला लाभलेला आशीर्वादाचा इतिहास  ऐकल्यावर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले  यांनी स्वतःला गगनगिरी महाराजचे लाभलेले सानिध्य व आशीर्वाद या बाबतच्या सर्व आठवणी आठवल्या व त्यांनी त्या सर्व आठवणींना उजाळा देत या देवस्थानाला भेट देण्याचे भाग्य लाभल्याचे सांगितले. पनवेल येथे प्रशासकीय अधिकारी असताना डॉ. भोसले यांना गगनगिरी महाराजांचे जवळून सानिध्य व आशीर्वाद लाभल्याचे त्यांनी वर्णन केले. खोपोली येथील महाराजांच्या आश्रमात गेल्यावर गगनगिरी महाराज आपणाला दोन - दोन तास जवळ बसवून मार्गदर्शन व चर्चा करीत असत. त्याद्वारे आध्यात्मिक शक्ती व आशीर्वाद मिळाल्याचेही वर्णन जिल्हाधिकारी डॉ भोसले यांनी केले.
गगनगिरी महाराजांचे शुद्ध चंपाषष्टी दि. 5 डिसेंबर 1997 पासून 5 वर्ष  क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानला आगमन झाले होते. त्यावरून त्यांनी अध्यक्ष अ‍ॅड पांडुरंग गायकवाड यांच्याकडून मोठ्या उत्कंठेने त्याबाबतच्या सर्व वृतांत ऐकूण घेतला. अँड पांडुरंग गायकवाड यांच्या खंडोबा भक्ती व सेवेबाबतही जिल्हाधिकारी यांना अँड पांडुरंग गायकवाड यांचे जीवनातील एखादी विशेष घटना ऐकण्याची एखाद्या इच्छा झाली. त्यावर पांडुरंग गायकवाड यांनी मुंबई येथे हायकोर्टातील वकील असताना सन 1988 च्या महाशिवरात्री उत्सवाला कोल्हापूर - गगनबावडा येथील गगनगडावर गगनगिरी महाराजांचे दर्शनाला गेले असता गोशाळेतील सेवकांनी माझ्या हातातील इम्पोर्टेड घड्याळ स्वतःसाठी ठेऊन घेतले. आणि त्याच्या हातातील नादुरुस्त घड्याळ मला दिले व मुंबईला परतल्यावर ते घड्याळ दुरुस्त करण्यास सांगितले. परंतु मुंबईला आल्यावर ते घड्याळ चांगले चालू राहिले. दुरुस्त करावे लागेल नाही. दि. 24 एप्रिल 1988 रोजी मी गगनगिरी महाराजांच्या सेवाकार्यात जात असताना. आमच्या ऑटोरिक्षाला बेस्ट बसने जोराची धडक समोरून दिली. रिक्षातील माझ्या सोबतचे दोघेजण जागीच ठार झाले. माझ्या फक्त डावा हात पूर्णपणे मोडला होता. मात्र गगनगिरी महाराजांकडून नंतर पत्र आले की त्यांनी माझ्यावरील काळ महाशिवरात्रीच्या रात्री गगनगडावर गोशाळेतील सेवकांच्या मार्फत माझे हातावरील घड्याळाचे माध्यमातून काढून घेतला होता. तुझ्या हातून मोठे कार्य होणे आहे मिळालेले जीवदान सत्कारणी लावावे असा उपदेश केला. आणि हाच माझ्या जीवनाचा टरनिंग पॉईंट ठरला. आणि महाराजांचे आशिर्वाद घेऊन मी 1990 पासून श्री खंडोबाचे सेवेत आयुष्याचे समर्पण दिले आहे. जिल्हा अधिकारी डॉ. भोसले यांनी लगेच खोपोली येथील प.पु गगनगिरी महाराजाच्या आश्रमातील मुख्य आशिष महाराज यांचे बरोबर फोन वरुन संवाद केला. पुन्हा महाराजां बरोबरच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच कोरठण खंडोबाला दर्शनाचा योग आज लाभल्याबद्दल आशिष महाराज यांच्याकडे ही खूप समाधान व्यक्त केले.
कोरठणच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू असे प्रतिपदन करून जिल्हा अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व इतरांनी भाकरी भाजी चे प्रसाद भोजन घेतले.
मंडळ अधिकारी सचिन पोटे व दीपक कदम, गोपी घुले, गारगुंडी उपसरपंच प्रशांत झावरे, पुजारी विकास व दत्तात्रय क्षीरसागर, व्यवस्थापक भाऊसाहेब पुंडे, विक्रम ठोमे, समाधान पुंडे, अमोल ठोमे, सुखदेव गायकवाड इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here