जामखेड पोलिसांची मोठी कारवाई, 4 पिस्टल, 6 जिवंत काडतुसांसह दोघांना अटक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 15, 2021

जामखेड पोलिसांची मोठी कारवाई, 4 पिस्टल, 6 जिवंत काडतुसांसह दोघांना अटक

 जामखेड पोलिसांची मोठी कारवाई, 4 पिस्टल, 6 जिवंत काडतुसांसह दोघांना अटक

नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः जामखेड शहरात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलत जामखेड पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे. शहरातील दोन तरुणांनी विक्रीसाठी आणलेली 1 लाख रुपये कीमतीचे चार पिस्टल व सहा जीवंत काडतुसे जप्त करत दोन तरूणांना अटक करण्यात आली असून, या मागे किती मोठे रॉकेट आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणामुळे मोठे रॅकेट उघड होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
  जामखेड शहरातील राहणारे ऋषी उर्फ (पप्पू) मोहन जाधव, वय 22 वर्षे राहणार जामखेड व दीपक अशोक चव्हाण, वय 32 वर्षे रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड यांना अटक करण्यात आली आहे. यातील ऋषी उर्फ (पप्पू) मोहन जाधव हा विनापरवाना बेकायदा मनाई केलेले 7.62 एम एम ची 25200 रुपये किमतीचे 1 अग्निशस्त्र पिस्टल व 2 जिवंत काडतुसे असे स्वतःहा जवळ बाळताना मिळून आला आहे. तसेच दुसरा आरोपी दीपक अशोक चव्हाण हा मनाई केलेले 70400 रुपये किमतीचे एकूण 3 पिस्टल व 4 जीवंत काडतुसे अशी विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगताना मिळून आला आहे. दि 12 रोजी पोलिसांनी ही पिस्टल आरोपींच्या घरी छापा टाकून जप्त केली आहेत. शहरात अनेक वेळा बेकायदेशीर रिव्हॉल्वर व गावठी कट्ट्यांचा वापर करून अनेक गुन्हे, तसेच खुन केल्याच्या घटनाही घडल्या आहेत त्यातच पुन्हा 4 पिस्टल पोलीसांनी जप्त केल्या आहेत. आता याचे मोठे रॉकेट तर नाही ना याचा तपास पोलीस करीत आहेत.

No comments:

Post a Comment