56 टक्के लसींचा साठा असाच पडून आहे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 17, 2021

56 टक्के लसींचा साठा असाच पडून आहे

 56 टक्के लसींचा साठा असाच पडून आहे


नवी दिल्ली ः
देशात कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढ आहे. यातच महाराष्ट्र कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट बनत आहे. राज्यात दिवसाला जवळपास 15 हजारापेक्षा अधिक नव्या कोरोना रुग्णांची पडत आहे. यावर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाही राज्य प्रशासन गंभीर नसल्याचे आरोप पत्राद्वारे केला होता. यातच आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही महाराष्ट्राच्या कोरोना लसीकरणावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्राच्या लसीकरणावरुन ठाकरे सरकारवर टीका करत ट्वीट केले की, केंद्राने महाराष्ट्र सरकारला 54 लाख लसींचा साठा पाठवला आहे. परंतु 12 मार्चपर्यंत यातील फक्त 23 लाख लसींचा साठा वापरला आहे. त्यामुळे 56 टक्के लसीचा साठा असाच पडून राहिला आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात लसीचा साठा शिल्लक असतानाही शिवसेनेचे खासदार राज्यासाठी आणखी अतिरिक्त लसीची मागणी करत आहेत. याआधी कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळीही राज्य सरकारने गोंधळ घातला होता. आणि आता कोरोना लसीकरणातही तेच सुरु असल्याचा आरोप जावडेकरांना केला आहे.
यासंदर्भातील ट्वीट प्रकाश जावडेकरांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून केले आहे. याचबरोबर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेणार आहेत. त्यामुळे या बैठकीत महाराष्ट्रासंदर्भात काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्राने राज्याला पत्र पाठवलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे यांना पत्र पाठवलं आहे. महाराष्टृात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला सुरूवात झाली आहे. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सरकारने ज्या प्रकारची काळजी घेतली होती, त्या उपाययोजना करणं गरजेचं, असं केंद्रीय आरोग्य सचिवांनी म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे यांना पत्र पाठवत कोरोनाबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यास सांगितलं आहे. होम आयसोलेशनबाबत पुन्हा समीक्षा करा. टेस्ट पॅाझिटीव्हीटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी करा. तसंच प्रत्येक पॅाझिटीव्ह रूग्णाचे 20-30 कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करा, कंटेनमेंट झोन पुन्हा तयार करा, असा सल्ला केंद्राने दिला आहे. याशिवाय, राज्यातील आरोग्य सुविधा पुरेशा आहेत, असं देखील केंद्राने म्हटलं आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here