डॉ. काळे यांच्या सदरबाजारमधील दवाखान्याचे उद्घाटन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 5, 2021

डॉ. काळे यांच्या सदरबाजारमधील दवाखान्याचे उद्घाटन

 डॉ. काळे यांच्या सदरबाजारमधील दवाखान्याचे उद्घाटन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
भिंगार ः येथील गरीबांचे डॉक्टर म्हणून परिचित असलेले डॉ.सतीश सुदाम काळे रा.भिंगार यांच्या सदरबाजार मधील दवाखान्याचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते सादिक सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी डॉ.सतीश काळे मानस प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल आण्णा बेलपवार,सचिन गायकवाड यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करुन डॉ काळे यांनी रुग्णांना सेवा देण्याचे कार्य सुरु केले.त्यांना स्वतःला गरिबीची जाणीव असल्याने ते गरिब रुग्णांना अत्यंत माफक शुल्क घेऊन  तपासतात.त्यांचे वडील सुदाम काळे यांनी डॉ अरुण शित्रे यांच्याकडे कंपाऊंडर म्हणून काम केले.हे करत असतांना त्यांनी डॉ शित्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या मुलाला डॉक्टर केले. निश्चितच त्यांना रुग्ण सेवेचे चांगले फळ मिळेल असे सादिकभाई यांनी सांगितले. शेवटी डॉ.काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment