छपाई व्यवसायीकांचा आज ‘ब्लॅक डे’ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 22, 2021

छपाई व्यवसायीकांचा आज ‘ब्लॅक डे’

 छपाई व्यवसायीकांचा आज ‘ब्लॅक डे’

केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सध्या महागाई वाढत आहे याचा फटका छपाई व्यवसायीकांनाही बसला म्हणून अहमदनगरसह देशातील छपाई व्यवसायिकांनी 22 मार्च हा ब्लॅक डे म्हणजे हाताला काळ्या पट्टया बांधून निषेध नोंदवला आहे.
केंद्र सरकारचं चुकीचं आयात निर्यात धोरण, छपाई व्यवसायाच्या नियमांचा अभाव, सरकारने घेतलेले आतताई निर्णय, कागद उत्पादकांची मनमानी, भरमसाठ वाढ आणि कोवीड संकट काळातील मंदी याकडे सरकारचं दुर्लक्ष, नियमानाचा अभाव यामुळे छपाई व्यवसायिक हवालदिल झाले असून सरकारचं लक्ष आपल्यावरील संकटाकडे वेधून घेण्यासाठी आज देशभरातले व्यवसायिक लॉकडाऊनच्या वर्षपुर्तीच्या निमित्ताने काळा दिवस पाळला आहेत. छपाई क्षेत्रातील सर्वच मटेरियलच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढल्याने व्यवसय करणे अवघड होऊन बसले आहे. अझुनही किंमती स्थिर नसून दिवसेंदिवस किंमती वाढत चालल्या आहेत. कोरोनाच्या संक्रमणामूळे सरकारने निर्बंध लावल्यामुळे लग्नसराईचा सिझन हातून गेला आणि आता महागाई मुळे ग्राहकही फिरकत नाहीत. अशा अनेक गोष्टींचा सामना सध्या छपाई क्षेत्रातील व्यवसायिकांना करावा लागत आहे म्हणून नगरमधील सर्व मुद्रक व्यवसायिकांनी 22 मार्च ब्लॅक डे पाळला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here