संत शिरोमणी शेख महंमद महाराज यात्रा कोरोनामुळे रद्द - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 15, 2021

संत शिरोमणी शेख महंमद महाराज यात्रा कोरोनामुळे रद्द

 संत शिरोमणी शेख महंमद महाराज यात्रा कोरोनामुळे रद्द

पाळणे, खेळणी दुकाने लावू नयेत
प्रतिवर्षी संत शिरोमणी शेख महंमद महाराज मंदिर परिसरात पाळणे, खेळणी दुकाने मोठ्या प्रमाणात थाटत असतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोणत्याही दुकानदाराने कोणत्याही प्रकारचे दुकान लावू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 - संत शिरोमणी शेख महंमद महाराज यात्रा कमिटी, श्रीक्षेत्र वाहिरा.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः तालुक्यातील श्रीक्षेत्र वाहिरा येथील संत शिरोमणी शेख महंमद महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भंडारा (यात्रा) प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो. मात्र यावर्षी कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे यात्रा रद्द करण्याचा निर्णय संत शिरोमणी शेख महंमद महाराज यात्राउत्सव कमिटीने घेतलेला आहे.
फाल्गुन शु.11 हा दिवस संत शिरोमणी शेख महंमद महाराज यांची पुण्यतिथीचा दिवस. पंचक्रोशितील बाहेरगावी गेलेले भाविक या दिवशी आपल्या गावी दर्शनासाठी येतात. तर पुणे,मुंबई, नाशिक सह महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून भाविक मोठ्या श्रध्देने दर्शनासाठी येतात. यावर्षी गुरुवार दि. 26 मार्च रोजी यात्रा उत्सव येत आहे मात्र शासकीय नियमांनुसार सर्वच ठिकाणचे धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश प्रशासनाकडून आले आहेत. दरवर्षी यात्रा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडतो. हजारो भाविक भक्त विविध भागातून या ठिकाणी यात्रेसाठी येतात. परंतु सध्या कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता यात्रा उत्सव रद्द करण्यात येत आहे. संत शिरोमणी शेख महंमद महाराजांवर अपार श्रध्दा असलेल्या भाविक भक्तांची यावर्षी दर्शना अभावी गैरसोय होत असल्याने खेद वाटत आहे. मात्र कोरोनाचे  संक्रमण रोखण्या करीता भाविकांनी समाधी मंदिर व परिसरात गर्दी न करता आपल्या घरीच प्रसाद करुन प्रशासनाला सहकार्य करावे. भंडार्याच्या दिवशी सकाळी सात वाजता सोशल डिस्टंशींग ठेऊन महाआरती होईल व त्या व्यतीरिक्त दिवसभर कोणतेही कार्यक्रम करण्यात येणार नाहीत.

No comments:

Post a Comment