इंदुरीकर यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा रद्द - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 31, 2021

इंदुरीकर यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा रद्द

 इंदुरीकर यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा रद्द


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अकोले ः महाराष्ट्र भूषण हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचेवर दाखल केलेला खोटा गुन्हा जिल्हा न्यायालयाने रद्द ठरविला यासाठी न्यायालयात भक्कम बाजू मांडणारे वकील के. डी. धुमाळ यांचे वारकरी संप्रदायाचे वतीने सत्कार करण्यात आला.
अकोले तालुक्याचे सुपुत्र निवृत्ती महाराज देशमुख हे कीर्तनातून समाजप्रबोधन करत असतात. महाराष्ट्र भर त्यांच्या किर्तनातून युवकांना व्यसनाधीनता पासून वाचावीत आहे. आपले विनोदी शैलीतून सुना व लोकांचे कान टोचूनआई वडील यांचा सांभाळ करायला लावत आहे. लग्नाच्या वराती बंद केल्या आहेत. हिंदू धर्मातील ग्रंथ, अभंग यांचे दाखले देत अनेक गोष्टी कीर्तनात सांगतात. ते आपले वाययीन विचार मांडत आहे.
राज्यात हिंदू धर्म विरोधी पुरोगामी म्हणांवरे काही व्यक्ती हिंदु धर्माला बदनाम करत आहेत. अश्या काही व्यक्तींनी लिंगनिदान च्या जाहिरात करतात म्हणून त्यांचे वर खटला दाखल केला होता.
संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयात अकोले तालुक्याचे दुसरे सुपुत्र वकील के.डी. धुमाळ यांनी भक्कम बाजू मांडून हिंदू धर्म परंपरा नुसार किर्तन असून यात कुठल्याही प्रकारची जाहिरात नाही. ंअशी भक्कम बाजू मांडून हिंदू धर्मातील रामायण, महाभारत, गुरुचरित्र यातील दाखले देऊन निवृत्ती महाराज देशमुख यांच्या वरील खटला निकाली काढला.
अँड के.डी. धुमाळ हे अगस्ती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष असून अकोले नगरपंचायत चे पाहिले नगराध्यक्ष आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल कळसेश्वर भजनी मंडळ व वारकरी संप्रदायाचे वतीने कळस ग्रामस्थ हभप विष्णू महाराज वाकचौरे, देवा महाराज वाकचौरे, गणेश महाराज वाकचौरे, भाऊसाहेब वाकचौरे, ज्ञानदेव निसाळ यांनी सत्कार केला.

No comments:

Post a Comment