बोठे आता कोतवालीच्या ताब्यात. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 25, 2021

बोठे आता कोतवालीच्या ताब्यात.

 बोठे आता कोतवालीच्या ताब्यात.

महिलेच्या विनयभंगाच्या गुन्ह्यात वर्ग करण्याचा न्यायालयाचा आदेश




नगरी दवंडी

अहमदनगर- रेखा जरे हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे यास एका महिलेच्या विनयभंग प्रकरणात वर्ग करण्यासाठी कोतवाली ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी दिलेल्या अर्जावर पारनेरच्या प्रथमवर्ग न्यायाधीश उमा बोर्‍हाडे यांनी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्याचा आदेश दिला आहे .आता बोठे यास विनयभंगाच्या गुन्ह्याला सामोरे जावे लागणार आहे. बोठे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

आरोपी बाळ बोठेच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपल्यामुळे दुपारच्या सत्रात  पारनेर न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. बोठे याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने बोठेला कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात वर्ग करण्याचा निर्णय दिला आहे. रेखा जरे यांच्या हत्येनंतर बाळ बोठे फरार असताना त्याच्याविरोधात शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोतवाली पोलिसांनी त्यासाठी याअगोदरच अर्ज दाखल केला होता. आज दुपारी आरोपी बोठेला ताब्यात घेण्यासाठी कोतवाली पोलिसांचा मोठा फौजफाटा हजर होता. 

हैद्राबाद येथून बोठे यास अटक करण्यात आल्यानंतर दि. 14 मार्च रोजी त्यास पारनेर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी प्रथम वर्ग न्यायाधिश उमा बोर्‍हाडे यांनी बोठेला सात दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. त्यानंतर अनुक्रमे चार व दोन दिवसांची पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली. आज पोलिस कोठडीची मुदत संपल्याने बोठे यास पुन्हा न्यायालापुढे हजर करण्यात आले. एक दिवस पोलिस कोठडी शिल्लक राहिल्याने पोलिसांनी बोठेस पोलिस कोठडी न मागता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याची न्यायाधिश उमा बोर्‍हाडे यांच्याकडे मागणी केली. त्यानुसार बोेठे यास पारनेरच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

 नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात बोठे याच्याविरोधात महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. बोठे फरार असल्यामुळे कोतवाली पोलिसांनाही बोठे हवा होता. 


No comments:

Post a Comment