महिलेचा विनयभंग प्रकरणात.. बाळ बोठे 1 दिवसांसाठी पोलीस कस्टडीत. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 26, 2021

महिलेचा विनयभंग प्रकरणात.. बाळ बोठे 1 दिवसांसाठी पोलीस कस्टडीत.

 महिलेचा विनयभंग प्रकरणात..

बाळ बोठे 1 दिवसांसाठी पोलीस कस्टडीत



नगरी दवंडी

अहमदनगर - रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठेला कोतवाली पोलिसांनी एका महिलेच्या विनयभंग प्रकरणी आज दुपारी न्यायालयात हजर करून पाच दिवसांची पोलिस कोठडीची मागणी केली परंतुे

 न्यायालयाने बोठे यास एक दिवसाची पोलिस कस्टडी सुनावली आहे.

रेखा जरे हत्येचा आरोपी बाळ बोठेच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात गुरूवारी वर्ग करण्यात आले. कोतवाली पोलिसांनी आरोपी बोठे याला अटक केल्यानंतर आज (शुक्रवारी) त्याला जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. आरोपी बोठे याला विनयभंगाच्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी तपासी अधिकारी तथा कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी केली. मात्र न्यायालयाने आरोपी बोठेला एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.


No comments:

Post a Comment