बोल्हेगाव परिसर मायक्रो कॅन्टोन्मेंट झोन म्हणून जाहीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 13, 2021

बोल्हेगाव परिसर मायक्रो कॅन्टोन्मेंट झोन म्हणून जाहीर

 बोल्हेगाव परिसर मायक्रो कॅन्टोन्मेंट झोन म्हणून जाहीर




नगरी दवंडी

अहमदनगर- अहमदनगर महापालिका हद्दीतील बोल्हेगाव भागातील राघवेंद्र स्वामी नगर परिसरातील संध्या जनरल स्टोअर ते उत्तरेकडील अपार्टमेंटपर्यंत  परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळून आलेले आहेत. या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संध्या जनरल स्टोअर ते उत्तरेकडील अपार्टमेंटपर्यंत परिसर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी क्षेत्र प्रतिबंधित करण्याचा आदेश आज मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी जारी केला आहे.

मायक्रो कंटेनमेंट झोन क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री सेवा इत्यादी वगळता सर्व दुकाने  दि. 13.3.2021 रोजी दुपारी दोन वाजल्यापासून 26.3.2021 रात्री बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment