बाळ बोठे फरार म्हणुन घोषित - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 4, 2021

बाळ बोठे फरार म्हणुन घोषित

                                                बाळ बोठे फरार म्हणुन घोषित

                                           पारनेर कनिष्ठ स्तर न्यायालयाचा निर्णय.....अहमदनगर-  तीन महिने पूर्ण होऊनही जरे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी बाळ बोठे हा पोलीस प्रशासनाला सापडू शकला नाही. आज पारनेर न्यायालयाचे कनिष्ठ स्तर प्रथम वर्ग न्यायाधीश उमा बोर्‍हाडे यांनी त्यास फरार घोषित केले आहे .काल न्यायालयात याबाबत सुनावणी पूर्ण झाली होती. आज न्यायालयाने निर्णय घोषित केल्याने बोठे त्यांच्या मालमत्तेवर जप्ती आणण्याची मागणी पोलीस प्रशासन करण्याची शक्यता आहे.

बोठेला फरार घोषित करावे या मागणीचा अर्ज पाटील यांनी चार दिवसांपूर्वी पारनेर न्यायालयात केला होता.या अर्जावर आज सुनावणी होऊन न्यायाधीश उमा बो-हाडे यांनी बोठेला फरार घोषित केले.

त्यामुळे बोठेची मालमत्ता जप्त करुन त्याची कोंडी करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांनी सांगितले.

बोठेला फरार घोषित करण्यात आल्याने तपासी अधिकारी पाटील बोठेच्या मालमत्तेची,बँक खात्यांची माहिती संकलित करून न्यायालयात सादर करतील व सदर मालमत्ता जप्त करण्याची तसेच बँक खाती सिल करण्यासंदर्भात आदेश देण्याची मागणी करतील.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here