सर्व ठराव एकमताने मंजूर : बँकेस 8 कोटी 1 लाखांचा निव्वळ नफा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 31, 2021

सर्व ठराव एकमताने मंजूर : बँकेस 8 कोटी 1 लाखांचा निव्वळ नफा

 सर्व ठराव एकमताने मंजूर : बँकेस 8 कोटी 1 लाखांचा निव्वळ नफा

मर्चंटस् को-ऑप बँकेची ऑनलाईन सभा उत्साहात संपन्न..


अहमदनगर ः
अहमदनगर मर्चंटस् को-ऑप बँकेच्या 48 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस शासनाने निर्धारित केलेल्या नियमांप्रमाणे व्हीडिओ कॉन्फरन्स, आदर व्हिडिओ, व्हीज्युअल मिन्सद्वारे उत्साहात संपन्न झाली. चेअरमन आनंदराम मुनोत व सर्व संचालकांनी  कार्यक्रमाच्या सुरुवातीला 2020-21 सालामध्ये ज्ञात-अज्ञात विविध क्षेत्रातील मृत्यू पावलेल्या व्यक्तींना तसेच कोरोना महामारीमुळे मृत्यू पावलेल्या श्रद्धांजली अर्पण करुन केली.
आनंदराम मुनोत पुढे म्हणाले, संपूर्ण जगाला कोरोना महामारीचा आर्थिक फटका बसलेला असून, त्याचा मोठा परिणाम बँकींग व्यवसायावर देखील झालेला आहे, असे असतांना सुद्धा अहमदनगर मर्चंटस् बँकेच्या चालू वर्षात  ठेवी रक्कम 135 कोटी 61 लाखांनी वाढलेल्या असून, बँकेच्या कर्जात 71 कोटी 95 लाखांनी वाढ झालेली आहे. कोरोमुळे बँकेतील कर्ज खातेदार, सभासद यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, या बाबींचा सहानुभुतीपूर्वक विचार करुन दि.1/5/2020 पासून कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत व रिबेटचे दर देखील वाढविले आहे. या वर्षी बँकेला 21 कोटी 70 लाखांचा ढोबळ नफा झालेला असून, त्यातील आयकर व इतर तरतुदी वजा जाता बँकेस भरघोस निव्वळ नफा 8 कोटी 1 लाखांचा झालेला आहे. बँकेच्या निव्वळ नफ्याचे प्रमाण 10.77 टक्के असून, 17.35 टक्के रिबेट दिलेला आहे.  भागभांडवल 20 कोटी 3 लाखांचे असून, राखीव व इतर निधी 145 कोटी 48 लाखांचा आहे.  बँकेचे संस्थापक चेअरमन व विद्यमान संचालक हस्तीमलजी मुनोत यांचे मार्गदर्शन तसेच सर्व संचालकांच्या सहकार्यामुळे व कर्मचार्यांच्या अथक प्रयत्नामुळे अहमदनगर मर्चंटस् बँकेची यशस्वीतेकडे घौडदौड सुरु असून, बँकेने डिजिटल बँकींगमध्ये नवनवीन सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. ते पुढे म्हणाले, कॅशलेस व्यवहार करण्यासाठी बँकेचे खातेदार, सभासद व व्यापारी यांनी प्राधान्य द्यावे. त्यामुळे त्यांच्या बहुमुल्य वेळेची बचत होते. व कोरोनाच्या प्रादुर्भावासही आळा लागेल.
बँकेच्या कामकाजात सुसुत्रता येण्यासाठी व कर्मचार्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आयएसओ 9001 चे मानांकन प्राप्त करण्यासाठी बँकेच्या तारकपुर शाखेची निवड करण्यात आली असून, त्याचे कामही प्रगतीपथावर असल्याचे सांगितले.बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक अनिल पोखरणा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा चेअरमन आनंदरामजी मुनोत यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बँकेचे व्हाईस चेअरमन सुभाष बायड यांनी सर्वांचे आभार मानले. सदरची सभा ऑनलाईन असल्यामुळे सभासदांच्या व सर्वांच्या सोयीसाठी डिजिटल बोर्ड लावण्यात आला होता. कोविड-19 चे सर्व नियम पाळून, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टसिंगचे पालन करुन सदर मिटिंग मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
सभेच्या सुरुवातीला बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कटारिया यांना सर्वांचे स्वागत केले व तद्नंतर बँकेचे चेअरमन आनंदराम मुनोत यांनी मागील वर्षीचा कामकाजाचा आढावा घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ठरावाचे वाचन केले. याप्रसंगी बँकेचे चेअरमन आनंदराम मुनोत, व्हाईस चेअरमन सुभाष बायड, बँकेचे ज्येष्ठ संचालक हस्तीमलजी मुनोत,किशोर गांधी, सीए अजय मुथा, अनिल पोखरणा, आदेश चंगेडिया, संजय बोरा, सीए मोहन बरमेचा, कमलेश भंडारी,  संजय चोपडा, अमित मुथा, संजीव गांधी, विजय कोथिंबीरे, श्रीमती मीनाताई मुनोत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन भंडारी आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here