अन्यथा पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने 29 मार्चला वाहतूक अनागोंदीचा सत्यबोधी सूर्यनामा करुन शिमगा आंदोलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 15, 2021

अन्यथा पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने 29 मार्चला वाहतूक अनागोंदीचा सत्यबोधी सूर्यनामा करुन शिमगा आंदोलन

 अन्यथा पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने 29 मार्चला वाहतूक अनागोंदीचा सत्यबोधी सूर्यनामा करुन शिमगा आंदोलन

बाह्यवळण रस्त्यावरील त्या पाच चौकात सिग्नल बसविण्याची मागणी

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः बाह्यवळण रस्त्यावरील पाच ठिकाणी असलेल्या चौकात अपघाताने अनेकांचा जीव जात असताना, सदर चौकात सिग्नल बसविण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने करण्यात आली आहे. सदर चौकात सिग्नल न बसविल्यास दि.29 मार्च रोजी धुलिवंदनाच्या दिवशी संघटनेच्या वतीने वाहतूक अनागोंदीचा सत्यबोधी सूर्यनामा आंदोलन करुन या चौकात वर्चुअल पध्दतीने बोंबा मारुन प्रशासनाच्या विरोधात शिमगा केला जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
ज्यांच्यावर कायदा राबवण्याची जबाबदारी आहे ते हलगर्जीपणा करत असल्याने समाजात अनागोंदी माजत आहे. बाह्यवळण रस्ता होऊन अनेक वर्षे झाली. या रस्त्यावरुन अनेक अवजड वाहने सुसाट वेगाने चालत असतात. चौपदरी चौकात देखील या वाहनांचा वेग कायम असल्याने अनेक अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागत आहे. केडगाव, नेप्ती, एमआयडीसी दूध डेअरी, विळद चौफुला, शेंडी रोड या पाच ठिकाणी चौकात सिग्नलची नितांत गरज आहे. वाहतूक पोलीस देखील योग्य प्रकारे कर्तव्य बजावत नसल्याने अपघात होणारे सदर ठिकाण यमराज चौक बनली असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. बाह्यवळण रस्त्यावरील पाच ठिकाणी असलेल्या चौकात त्वरीत सिग्नल बसविण्यासाठी संघटनेच्या वतीने पाठपुरावा सुरु करण्यात आला असून, या मुख्यमंत्री, गृहमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यासह स्थानिक प्रशासनाला निवेदन पाठविण्यात आले आहे. दि.29 मार्च पुर्वी बाह्यवळण रस्त्यावर असलेल्या चौकांमध्ये सिग्नल न बसविल्यास वाहतूक अनागोंदीचा सत्यबोधी सूर्यनामा आंदोलन करुन प्रशासनाला जाग आणण्यासाठी सदर चौकात वर्चुअल पध्दतीने शिमगा केला जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here