24 तासात 1,680 कोरोना पॉझीटीव्ह. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 31, 2021

24 तासात 1,680 कोरोना पॉझीटीव्ह.

 24 तासात 1,680 कोरोना पॉझीटीव्ह.

आज ही कोरोनाचा उद्रेक..

अहमदनगर ः आज जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला. मार्च महिन्यातील सर्वाधिक रुग्ण संख्या आज नोंदवली गेली. गेल्या 24 तासांमध्ये 1 हजार 680 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले.
नगर शहरात सर्वाधिक 433 रुग्ण आढळले. त्या खालोखाल राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव आणि कर्जत तालुक्यात रुग्णसंख्या शंभरच्या पुढे गेली आहे. अहमदनगर शहर 433, राहाता 229, संगमनेर 105, श्रीरामपूर 116, नेवासे 55, नगर तालुका 74, पाथर्डी 63, अकोले 61, कोपरगाव 114, कर्जत 101, पारनेर 60, राहुरी 92, भिंगार शहर 16, शेवगाव 61, जामखेड 37, श्रीगोंदे 37, इतर जिल्ह्यातील 12 आणि मिलिटरी हॉस्पिटल 14 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयानुसार 677, खाजगी प्रयोगशाळेनुसार 514 आणि रॅपिड चाचणीमध्ये 489 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरासह जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये कोरोना संसर्गाचा आकडा हा शंभरी पार केला आहे. त्यामुळे जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट अधिक गडद झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा करत असलेल्या उपाययोजना या अपुर्‍या पडतात की काय, असे दिसते आहे. आज वाढणार्‍या आकड्याबरोबरच उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या देखील सात हजार पुढे गेली आहे.

No comments:

Post a Comment