कोरोनाचा कहर! 24 तासात 1 हजार 347 कोरोना पॉझिटिव्ह... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 29, 2021

कोरोनाचा कहर! 24 तासात 1 हजार 347 कोरोना पॉझिटिव्ह...

 कोरोनाचा कहर! 24 तासात 1 हजार 347 कोरोना पॉझिटिव्ह...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्ह्यात धूलिवंदनाची उत्साह असतानाच कोरोना बाधितांच्या आकड्याने आज पुन्हा उच्चांक गाठला. आतापर्यंतची सर्वाधिक बाधितांची संख्या झाली. मार्च महिन्यातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली. जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 1 हजार 347 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरात सर्वाधिक 453 रुग्ण आढळले. त्या खालोखाल राहाता आणि कोपरगाव तालुक्यात रुग्णसंख्या आहे. ती अनुक्रमे 116 आणि 102 एवढी आहे. नगर शहरात वाढती रुग्णसंख्या पाहून आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील सर्व कोविड सेंटर सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासनाची स्वयंसेवी संस्थांची चर्चा सुरू झाली आहे. स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
अहमदनगर शहर 453, राहाता 116, संगमनेर 90, श्रीरामपूर 75, नेवासे 18, नगर तालुका 68, पाथर्डी 92, अकोले 21, कोपरगाव 102, कर्जत 07, पारनेर 26, राहुरी 49, भिंगार शहर 26, शेवगाव 66, जामखेड 60, श्रीगोंदे 60, मिलिटरी रुग्णालय 03 आणि  इतर जिल्ह्यातील 16 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. लष्करी तळालगत असलेल्या भिंगार शहरात 26 जणांना कोरोना ससंर्गाचे निदान झाले. याचबरोबर लष्करी रुग्णालयात देखील तीन जणांना संसर्गाचे निदान झाले. गेल्या काही दिवसांपासून लष्करी रुग्णालयात एकही रुग्ण बाधित नव्हता. तशी नोंद होती. परंतु कोरोनाचा आता वेग पाहता लष्करी रुग्णालयात देखील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयानुसार 753, खाजगी प्रयोगशाळेनुसार 454 आणि रॅपिड चाचणीमध्ये 148 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले.

No comments:

Post a Comment