अहमदनगर महानगरपालिकेचा 2021-22 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 31, 2021

अहमदनगर महानगरपालिकेचा 2021-22 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर

 अहमदनगर महानगरपालिकेचा 2021-22 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर.नगरी दवंडी

अहमदनगर- 2021-22 या आर्थिक वर्षामध्‍ये नागरिकांना नागरी सुविधा देताना शहर व उपनगराच्‍या विकासाच्‍या दृष्‍टीने व आपणा सर्वाच्‍या सहकार्याने तसेच शहर सुधार समिती, सर्व सामाजिक संस्‍था, अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी, जागरूक नागरी मंच यांच्‍या सहकार्याने शहराचा विकास करण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍यात येणार आहे. मनपाचे उत्‍पन्‍नाचे स्‍त्रोत वाढविण्‍यासाठी, मनपाचा इतर खर्च कमी होण्‍याच्‍या दृष्टिने प्रयत्‍न करण्‍यात येणार आहे. 

शहराच्‍या सौदर्यात भर पडण्‍याच्‍या दृष्टिने सीनानदीच्‍या कडेने हरितपट्टा विकसीत करण्‍यात येत आहे. सिना नदीच्‍या कडेने सदरचे काम  पूर्ण झाल्‍यावर शहराच्‍या सौदर्यात भर पडणार आहे.

 शहरातील ओढे नाले सुशोभिकरण करण्‍यासाठी खाजगी व सामाजिक संस्‍था यांचेकडून मदत घेवून ओढे,नाले व परिसर सुशोभित करण्‍यात येईल त्‍यामुळे शहर सौदर्यात भर पडेल.

 शहर सौदर्यात भर पडण्‍यासाठी शहर व उपनगरातील छोटे मोठे चौक सुशोभिकरण, रस्‍त्‍याच्‍या मधोमध डिव्‍हायडर टाकून सुशोभित करण्‍यासाठी खाजगी कंपनी, संस्‍था यांच्‍याकडून निधी उपलब्‍ध करण्‍याच्‍या दृष्टिने कार्यवाही सुरू आहे. प्रशासनाने देखील याबाबत कार्यवाही करावी.

 शहरातील कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्‍यामुळे सर्व सामान्‍य रूग्‍णांवर उपचार होण्‍याकरिता मनपाच्‍या वतीने 3 कोवीड सेटर कार्यान्‍वीत करण्‍यात आले. तसेच 2 कोवीड सेंटर उभारणीचे काम सुरू आहे. परंतु नागरिकांनी स्‍वत:ची काळजी घेवून मा.शासनाचे नियम पाळून संसर्ग होवू यासाठी दक्षता घ्‍यावी. आपल्‍यामुळे इतरांना त्रास होणार नाही याबाबत खबरदारी घ्‍यावी व प्रशासनास सहकार्य करावे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्‍याने नागरिकांनी मास्‍क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केल्‍यास व स्‍वत:ला सुरक्षित ठेवल्‍यास कोरोनाला हद्दपार करण्‍यास वेळ लागणार नाही. यासाठी मा.शासनाने दिलेल्‍या नियमाचे पालन करावे. व महानगरपालिका व पोलिस प्रशासनास सहकार्य करावे.

 कै.बा.देशपांडे दवाखान्‍यातील रक्‍तपेढी मनपाच्‍या वतीने सुरू करण्‍यात येणार आहे. त्‍यादृष्टिने प्रशासनास आदेश देण्‍यात आले. शहरातील गोर गरिब रूग्‍णांना रक्‍ताची गरज पाहता कमीत कमी दरामध्‍ये रक्‍त पिशवी उपलब्‍ध व्‍हावी यादृष्टिने प्रशासनाने कार्यवाही करावी..

 चितळे रोड येथील नेहरू मार्केट इमारत व सावेडी शॉपिंग कॉम्‍प्‍लेक्‍स मनपाच्‍या किंवा मा.शासनाच्‍या निधीतून बांधण्‍यात येणार आहे. मा.शासनाकडे निधीसाठी प्रस्‍ताव सादर करण्‍यात येईल.  सदर इमारतीचे बांधकाम झाल्‍यास शहरातील बेरोजगारांना रोजगार उपलब्‍ध होण्‍यास मदत होवून मनपाचे उत्‍पन्‍नात देखील वाढ होईल.

 सावेडी गांव येथील मनपाच्‍या जागेत अदयावत शॉपिंग कॉम्‍प्‍लेक्‍स बांधण्‍याचा मानस आहे. प्रशासनास सदर बाबतचा प्रस्‍ताव तयार करणे बाबतच्‍या सुचना दिलेल्‍या आहेत; यामुळे मनपाच्‍या उत्‍पन्‍न वाढण्‍यास मदत होईल.

मनपाच्‍या जागेत इमारत बांधणे , गाळे बांधून भाडे तत्‍वावर देवून मनपाच्‍या उत्‍पन्‍नात वाढ करण्‍याच्‍या दृष्टिने प्रयत्‍न करणार आहे.

 शहर व उपनगरात डिजीटल जाहिरात बोर्ड लावून तसेच जाहिरात बोर्ड चे भाडे वाढविणे, तसेच मोबाईल टॉवरचे भाडे वाढवून त्‍यांना दंड आकारून मनपाचे उत्‍पन्‍न वाढविण्‍यात येईल.

   मनपाचे उत्‍पन्‍न वाढविण्‍यासाठी स्‍वतंत्र उपायुक्‍तची नेमणुक करण्‍यात  येवून मनपाचे उत्‍पन्‍न वाढविण्‍यांत येईल.

 मनपाच्‍या  पिंपळगांव माळवी येथील जागेत मनपाचे उत्‍पन्‍नाचे दृष्टिने फिल्‍म सिटी सारखा प्रकल्‍प उभारण्‍याच्‍या  दृष्टिने कार्यवाही सुरू आहे. या बाबत प्रस्‍ताव करण्‍याचे आदेश देण्‍यात आलेले आहेत. सदर प्रकल्‍पामुळे मनपाच्‍या उत्‍पन्‍नात वाढ होईल.

  अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा विषयक कामातील पाईप लाईन टाकण्‍याच्‍या कामात येणा-या अडचणी बहुतांश सोडविण्‍यात आल्‍या व कामास गती देण्‍यात आली. मे अखेर सदर पाण्‍याची पाईप लाईन टाकून पूर्ण होईल या पाईप लाईनद्वारे विळद पंपींग स्‍टेशन येथे पाणी साठवणुक करून शहरामध्‍ये नागरिकांना पिण्‍याचे पाणी मुबलक व सुरळीत देण्‍याचा प्रयत्‍न आहे.

 अहमदनगर शहर पाणी पुरवठा योजना फेज-2 योजनेच्‍या कामाबाबत वारंवार बैठका घेवून योजनेच्‍या कामास गती देण्‍यात आली असून काही झोन मध्‍ये काम पूर्णत्‍वाच्‍या मार्गावर आहे अशा झोन मध्‍ये तातडीने  पाणी पुरवठा वितरणाबाबत कार्यवाही करण्‍याच्‍या सुचना देण्‍यात आलेल्‍या असून अशा भागात नागरिकांना पाणी वितरणाचे 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here