जिल्हा बँकेत पतसंस्थांच्या ठेवींना 1 टक्का अधिक व्याज मिळण्यासाठी पाठपुरावा करू : प्रशांत गायकवाड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 3, 2021

जिल्हा बँकेत पतसंस्थांच्या ठेवींना 1 टक्का अधिक व्याज मिळण्यासाठी पाठपुरावा करू : प्रशांत गायकवाड

 जिल्हा बँकेत पतसंस्थांच्या ठेवींना 1 टक्का अधिक व्याज मिळण्यासाठी पाठपुरावा करू : प्रशांत गायकवाड


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे विजय मिळाला आहे. सर्वांनी केलेल्या सहकार्याचे ऋण कामांच्या माध्यमातून फेडणार आहे. जिल्हा बँकेत पतसंस्थांचा प्रतिनिधी म्हणून काम करत पतसंस्थांच्या प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार आहे. बँकेत मोठ्या प्रमाणात असलेल्या पतसंस्थांच्या ठेवींना 1 टक्का अधिक व्याजदर मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक प्रशांत गायकवाड यांनी देवून पतसंस्थांना आधार व पाठबळ देणार्‍या स्थैर्यनिधी सारख्या संस्थेने केलेला सत्कार प्रेरणादायी आहे,असे प्रतिपादन केले.
नगर जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघाच्या वतीने जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक प्रशांत गायकवाड यांचा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, स्थैर्यनिधी सहकारी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, उपाध्यक्ष वसंत लोढा, संचालक शिवाजी कपाळे, सुशीला नवले, सहकार भरतीचे अध्यक्ष रवी बोरावके, आर.डी.मंत्री, उमेश मोरगावकर, विठ्ठल आभंग, बापूसाहेब उंडे, व्यवस्थापक महेश जाधाव आदी उपस्थित होते. यावेळी काका कोयटे म्हणाले, जिल्हा बँकेत पतसंस्थांचा प्रतिनिधी असावा अशी भूमिका मी निवडणुकीच्या सुरवातीला घेतली होती. प्रशांत गायकवाड यांच्या माध्यमातून ही इच्छा पूर्ण झाली आहे. पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्याचा बँकेत प्रवेश झाला असल्याने प्रशांत गायकवाड पतसंस्थांच्या प्रश्नांना प्राधान्य देतीलच. सुरेश वाबळे म्हणाले, प्रशांत गायकवाड यांच्या रूपाने चांगले काम करणार्‍या युवक जिल्हा बँकेला मिळाला आहे. पारनेर बाजार समितीचे सभापती म्हणून केलेल्या उत्कृष्ठ कामाची ही पावती आहे.
यावेळी उपनिबंधक दिग्विजय आहेर, रवी बोरावके यांचेही शुभेच्छापर भाषणे झाली. शिवाजी कपाळे यांनी प्रास्ताविक केले, महेश जाधव यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment