राष्ट्रवादीचे तहसील कार्यालयासमोर इंधन दरवाढीच्या विरोधात चूल पेटवत आंदोलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 6, 2021

राष्ट्रवादीचे तहसील कार्यालयासमोर इंधन दरवाढीच्या विरोधात चूल पेटवत आंदोलन

 राष्ट्रवादीचे तहसील कार्यालयासमोर इंधन दरवाढीच्या विरोधात चूल पेटवत आंदोलन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

श्रीगोंदा ः केंद्र सरकारने गॅस व इंधन दरवाढ कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा यासाठी श्रीगोंदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्षा शुभांगी पोटे व महीला आघाडीच्या तालुकाध्यक्षा मीनल भिंताडे यांनी महिलां पदाधिकारीसह श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर चूल पेटवत श्रीगोंदा तहसीलदार प्रदीप पवार यांना निवेदन देऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.
   आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असतांनाही केंद्र सरकारने वारंवार गॅस तसेच इंधन दरवाढ करून सर्वसामान्य जनतेला रोजच महागाईच्या खाईत लोटत आहे.  तरी केंद्र सरकारने गॅस व इंधन दरवाढ कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा यासाठी श्रीगोंदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर चूल पेटवत श्रीगोंदा तहसीलदार प्रदीप पवार यांना निवेदन देऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, नगरसेविका सीमा गोरे, मनीषा शेलार, पंचायत समिती सदस्य कल्यानी लोखंडे, शोभाताई शिर्के, विद्याताई आनंदकर, निर्मला डफळ, आशाताई शेलार, गीताताई गायकवाड, मृणाली शेलार, मुकुंद सोनटक्के, युवकचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संदिप उमाप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here