प्रशांत चव्हाण यांना धम्मभुषण पुस्कार प्रदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 13, 2021

प्रशांत चव्हाण यांना धम्मभुषण पुस्कार प्रदान

 प्रशांत चव्हाण यांना धम्मभुषण पुस्कार प्रदान


नगरी दवंडी/प्रतिनिधी

श्रीगोंदा ः अहमदनगर येथे 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या दुसर्‍या एकता धम्म परिषदेमध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या अहमदनगरशाखेच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते श्रीगोंदा येथील प्रशांत चव्हाण सर यांना धम्मभुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
    भगवान गौतम बुद्ध , छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर तसेच माता जिजाऊ , माता रमाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या सह सर्वच महापुरुषांचा इतिहास आपल्या व्याख्यानातून गेल्या अनेक वर्षांपासून मांडत असलेल्या श्रीगोंदा येथील प्रशांत चव्हाण सर यांच्या कार्याची दखल घेऊन अहमदनगर येथे झालेल्या दुसर्‍या एकता धम्म परिषदेमध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या अहमदनगरशाखेच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते धम्मभुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी राष्ट्रीय महासचिव जगदीश गवई , राष्ट्रीय सचिव वसंत पराड , राष्ट्रीय सचिव भिकाजी कांबळे ,अशोक केदारे , भदंत बी सारीपुत्ति, जिल्हा अध्यक्ष भगवंत गायकवाड, जिल्हा महासचिव राजेंद्र साळवे व जिल्हा सचिव सतिश ओहोळ प्रमुख मान्यवर उपस्थितीत होते. पुरस्कार मिळाले बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment