गॅस पाईपलाईनच्या खोदकामामुळे झाडांची विनापरवाना मोठी कत्तल वनविभागाचे दुर्लक्ष - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 13, 2021

गॅस पाईपलाईनच्या खोदकामामुळे झाडांची विनापरवाना मोठी कत्तल वनविभागाचे दुर्लक्ष

 गॅस पाईपलाईनच्या खोदकामामुळे झाडांची विनापरवाना मोठी कत्तल वनविभागाचे दुर्लक्ष


नगरी दवंडी/प्रतिनिधी

श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव , ढोरजा , कोथुळ येथील रस्त्यालगत असणार्‍या शेतजमीनीतुन कालिया प्रोजेक्ट प्रा.लि. या कंपनीमार्फत भारत गॅस पाईपलाईनचे खोदकाम चालू असून या कंपनीने रस्त्यालगत असलेल्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल सुरू केली असून यासाठी त्यांनी वनविभागाची कोणतीही परवानगी घेतलेली नसताना देखील या कडे वनविभागाच्या अधिकार्‍यांनी कानाडोळा करत दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
       या बाबत सविस्तर असे की कालिया प्रोजेक्ट प्रा.लि. या कंपनीमार्फत तालुक्यातून जाणार्‍या भारत गॅस पाईपलाईनचे खोदकाम सुरू असून हे खोदकाम करताना रस्त्याच्या कडेला असणारी लिंब, चंदन, यासारख्या वनसंपदेची कत्तल सुरू केली या कत्तलीत परिपक्व झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. हे झाडे तोडण्यासाठी वनविभागाची परवानगी घेणे गरजेचे असून अशी कोणत्याही प्रकारची परवानगी त्यांनी घेतलेली नसल्याने या कडे वनविभागाच्या अधिकार्‍यांनी कानाडोळा करत दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर वनविभाग कोणती कारवाई करणार की नाही याची चर्चा तालुक्यात सुरू असून या बाबत अनेक तक्रारी झाल्या असून मागील आठवड्यात या कंपनी विरोधात नागरिकांनी तहसीलदार प्रदीप पवार यांना निवेदन देत उपोषण केले आहे.

No comments:

Post a Comment