मोबाईल, मोटरसायकल चोरणारा गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 27, 2021

मोबाईल, मोटरसायकल चोरणारा गजाआड.

 मोबाईल, मोटरसायकल चोरणारा गजाआड.

शेवगाव.. पाथर्डी तालुक्यातील घरफोडीची कबुली..

पाथर्डी -
विकास शिवाजी नेहुल वय 43, रा. जवखेड दुमला ता. पाथर्डी यांच्या घरातून रेडमी कंपनीचा मोबाईल, सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणार्‍या महेंद्र अंगत पवार वय 20 रा. रामगव्हाण ता. अंबड जि. जालना यास पाथर्डी पोलिसांनी गजाआड करून गुन्हा दाखल केला आहे.

   गुन्हा दाखल झाल्यानंतर पो.नि.अनिल कटके हे त्यांचे पथकातील कर्मचार्‍यांना हा गुन्हा महेंद्र पवार रा. रामगव्हाण ता. अंबड जि. जालना याने व त्याचे साथीदाराने मिळुन केला असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई गणेश इंगळे, पोहेकॉ. मनोहर गोसावी, पोना सुरेश माळी, विशाल दळवी, दिपक शिंदे, रवि सोनटक्के, शंकर चौधरी, पोकॉ/प्रकाश वाघ, सागर ससाणे, रोहित येमुल व चापोना/चंद्रकांत कुसळकर यांनी रामगव्हाण ता. अंबड जि. जालना येथे जावून मिळालेल्या माहिती वरुन चोडाळा फाटा येथे जावुन सापळा लावुन थांबले असता एक मोटार सायकलवर संशयीत मोटार सायकल टाकुन पळु लागले त्यातील एका आरोपीस पाठलाग करुन ताब्यात घेतले व दोघे आरोपी उसाचे शेतात पळुन गेले. ताब्यात घेतलेल्या आरोपीस चौकशी केली असता त्याचे नाव महेंद्र अंगत पवार वय 20 रा . रामगव्हाण ता . अंबड जि . जालना असे सांगीतले त्याची अंगझडती घेतली असता त्याचे पॅन्टचे खिश्यामध्ये एक निळे रंगाचा रेडमी कंपनीचा 7 ए मोबाईल मिळुन आला आहे . पळुन गेलेल्या आरोपी बाबत विचारपुस केली असता त्याने त्यांची नावे प्रतिम सुदाम चव्हाण रा . खंडाळा , पारधी वस्ती , ता . पैठण जि.औरंगाबाद महेश चव्हाण रा . वडेगोद्रे ता . अंबड जि . जालना असे असल्याचे सांगीतले . त्याचेकडे मिळुन आलेल्या मोबाईल बाबत विचारपुस करता त्याने तालुक्यातील जवखेड दुमाला येथील एका घरात घुसुन चोरी केल्याचे कबुल केले. काळे रंगाची पांढरे पटटा असलेली टी.व्ही.एस. स्टार सिटी कंपनीची मोटार सायकल साथीदारासह शेवगाव येथील शिवाजीनगर , देशी दारुचे दुकाणासमोरुन चोरी केली असलेयाची कबुली दिली शेवगाव पोलीस स्टेशनला चौकशी केली असता मोटार सायकल चोरी बाबत शेवगाव पोलीस स्टेशन गुन्हा दाखल असले बाबत माहिती मिळाली आरोपी महेंद्र अंगत पवार वय 20 रा . रामगव्हाण ता . अंबड जि . जालना याचेकडे चोरीचा 4000 / - रु . किमतीचा निळे रंगाचा रेडमी कंपनीचा 7 ए मोबाईल व 20000 / - रु . किमतीची काळे रंगाची पांढरे पटटा असलेली टी.व्ही.एस. स्टार सिटी कंपनीची मोटार सायकल मिळुन आल्याने मुद्देमालासह ताब्यत घेवुन आरोपी व मुद्देमाल कारवाई साठी पाथर्डी पोलीस स्टेशन चे ताब्यात देण्यात आले आहे . पुढील तपास पाथर्डी पो.स्टे.करीत आहे. ही कारवाई मा . श्री . मनोज पाटील, पोलीस अधीक्षक , अहमदनगर सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सुदर्शन मुंढे , उपविभागीय पोलीस अधिकारी , शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment