महिला सक्षमीकरणासाठी काम करणार : कोठावळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 13, 2021

महिला सक्षमीकरणासाठी काम करणार : कोठावळे

 महिला सक्षमीकरणासाठी काम करणार : कोठावळे

सावरगाव ग्रामस्थांच्यावतीने राष्ट्रवादीच्या राजेश्वरी कोठावळे यांचा सन्मान

नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे यांच्या सत्काराचे आयोजन सावरगाव येथे करण्यात आले होते.  नुकतीच राजेश्वरी कोठावळे यांची अहमदनगर राष्ट्रवादीच्या युवती जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असून त्यानिमित्त सावरगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी सावरगावचे नवनिर्वाचित उपसरपंच प्रदीप गुगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते बलुतेदार संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिरतार व सावरगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
कोठावळे यांचा सावरगावचे उपसरपंच गुगळे यांनी शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. यावेळी राजेश्वरी कोठावळे बोलताना म्हणाल्या की  समाजामध्ये सामाजिक भान ठेवून  महिला सक्षमीकरणासाठी काम करणे गरजेचे आहे.  खासदार सुप्रियाताई सुळे व आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली पुढील काळात महिलांच्या प्रश्नांसाठी काम करणार आहे. यावेळी कोठावळे यांनी सावरगाव चे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस व गावच्या विकासासाठी शुभेच्छा दिल्या.
    यावेळी राष्ट्रवादीच्या सुपा येथील स्वाती इंगळे, पारनेर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या नेत्या माया’ताई रोकडे, कुंडलिक शेळके, संतोष घनदाट, मंगेश शिंदे, नवनाथ गांजे, बाळासाहेब चिकने, रविंद्र गायखे, विशाल सोनावणे, संतोष आचार्य जालिंदर गांजे, आकाश गुगळे, शेखर गुगळे, मंगेश शिरतार, रामदास साळवे, बाजीराव शेळके, सीताराम साळवे, महेश झावरे, यावेळी हे मान्यवर  प्रमुख उपस्थित होते. तसेच आम्ही सावरगाव ग्रुपचे सदस्य व सावरगाव ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here