मध्यमवर्गीयांना झटका... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 4, 2021

मध्यमवर्गीयांना झटका...

 मध्यमवर्गीयांना झटका...

गॅससिलेंडरच्या किंमतीत वाढ

नवी दिल्ली :
सर्वसामान्यांना महागाईने मोठा झटका दिलाय. घरगुती गॅसच्या किंमतीत मोठी वाढ झालीय. तेल कंपन्यांनी ङझॠ सिलिंडरच्या किंमती जाहीर केल्यायत. हे दर प्रति सिलिंडर 25 रुपयांनी वाढवण्यात आलेयत. व्यावसायिक सिलेंडरचे दर सहा रुपयांनी वाढवण्यात आलेयत. याआधी कमर्शिअल एलपीजी सिलेंडर (19 ज्ञस) चे दर 190 रुपये प्रति सिलिंडर वाढवण्यात आलेयत.घरगुती गॅसच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ झाल्यानंतर दिल्लीत एलपीजीची किंमत 719 रुपये झालीय. आजपासून म्हणजेच 4 फेब्रुवारीपासून हे दर लागू झालेयत. डिसेंबरमध्ये खजउ ने घरगुती गॅसच्या किंमती दोनवेळा वाढवल्या. कंपनीने 2 डिसेंबरला 50 रुपयांनी वाढ केली. त्यानंतर 15 डिसेंबरला 50 रुपये आणखी वाढवले.

याआधी 1 फेब्रुवारीला कमर्शिअल एलपीजी (19ज्ञस) चे दर 190 रुपयांनी वाढले. ज्यामध्ये आतापर्यंत 6 रुपयांची कपात झालीय. मुंबईत कमर्शिअल सिलिंडरची किंमत 1482.50 रुपये आहे. तुम्ही काही मिनिटात तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरचे दर तपासू शकता. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती तपासू शकता. यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपन्यांच्या वेबसाईटवर जावे लागेल. इथे कंपन्या नवे दर जाहीर करतात. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर तुम्ही शहरातील गॅस सिलिंडरचे दर तपासू शकता.

No comments:

Post a Comment