आघाडी सरकार - राज्यपाल कोश्यारी वाद विकोपाला.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 11, 2021

आघाडी सरकार - राज्यपाल कोश्यारी वाद विकोपाला..

 आघाडी सरकार - राज्यपाल कोश्यारी वाद विकोपाला..

राज्यपालांना विमानातून उतरवले !

मुंबई :
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकार यांच्यातील वाद हा संपण्याचे नावच घेत नाही असेच आजच्या घटनेच्या माध्यमातून समोर आले आहे. आज घडलेल्या घटनेत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर चार्टर्ड विमानातून खाली उतरण्याची नामुष्की ओढावली. राज्य सरकारकडून या चार्टर्ड विमानासाठी लाल सिग्नल दाखविण्यात आला. त्यामुळेच राज्यपालांना उत्तरांखडच्या दौर्‍यावर जाण्यासाठी चार्टर्ड विमान उपलब्ध होऊ शकले नाही. या चार्टर्ड विमानात बसल्यावर राज्य सरकारने या विमानासाठी परवानगी दिली नसल्याची बाब समोर आली. त्यामुळेच राज्यपालांना चार्टर्ड विमानाएवजी नियमित अशा कमर्शीअल फ्लाईटमधून प्रवास करण्याची वेळ आली. या कर्मशिअल फ्लाईटमधून राज्यपाल उत्तराखंड दौर्‍यासाठी निघाले असल्याचे कळते.

   ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील वादात आजच्या फ्लाईट रद्द होण्याच्या घटनेमुळे आणखी एका मुद्द्याची भर पडली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उत्तराखंड दौर्‍यासाठी निघाले होते. परंतु राज्य सरकारकडून विमान उड्डाण करण्याची परवानगी मिळाली नसल्यामुळे प्रवास रद्द केला आहे. उत्तराखंड दौर्‍याचा भाग म्हणून राज्यपाल यांचे विमान देहरादून येथे उतरवण्यात येणार होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा शुक्रवारी त्याठिकाणी नियोजित कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी ते निघाले होते. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी सरकारी विमानात बसले होते. जवळपास 15 मिनिटांच्या कालावधीनंतर राज्यपाल विमानातून खाली उतरल्याने विरोधकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विरोधकांनी देखील या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे.
   राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मसूरीमध्ये एका नियोजित कार्यक्रमासाठी जायचे होते. राज्यपाल आज उत्तराखंड दौर्‍यावर निघाले होते. यासाठी ते सरकारी विमान वापरत होते. सकाळी 9.25 वाजता राज्यपाल राज भवनावरुन निघाले 10 वाजता राज्यपाल विमान तळावर पोहोचले त्यांचे विमान 10.30 वाजता उड्डाण घेणार होते. राज्यपाल विमानात जाऊन बसले परंतु 15 मिनिटे झाले तरी विमानाने उड्डाण घेतला नाही. त्यामुळे राज्यपालांनी विमानातून पायउतार करुन पुन्हा विश्रांती गृहात येऊन बसले. काही मिनिटानंतर नियमित अशा कर्मशिअल फ्लाईटमधून राज्यपालांनी आपला देहरादूनच्या दिशेने प्रवास सुरू केला असल्याचे कळते.

No comments:

Post a Comment