ढाकणवाडी सौ. सुरेखा ढाकणे व उपसरपंचपदी सुनील ढाकणे यांची निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 13, 2021

ढाकणवाडी सौ. सुरेखा ढाकणे व उपसरपंचपदी सुनील ढाकणे यांची निवड

 ढाकणवाडी सौ. सुरेखा ढाकणे व उपसरपंचपदी सुनील ढाकणे यांची निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी

खरवंडी कासार ः पाथर्डी तालुक्यातिल ढाकणवाडी ग्रामपंचायत निडणुकीत संत भगवान बाबा ग्राम विकास पॅनलने सामजिक कार्यकर्ते मोहन दादा ढाकणे यांच्या नेतृत्व खाली विजय मिळवला.सरपंच पदी सुरेखा राजेंद्र ढाकणे,तर उपसरपंच पदी सुनील ढाकणे यांची निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुण बाळासाहेब दळवी यांनी काम पाहिले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाबुराव ढाकणे व गयाबाई ढाकणे यांच्यासह समस्त गावकरी उपस्थित होते.
    ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य नक्कीच गावाचा विकास करतील.त्यासाठी त्यांना नियमित मार्ग दर्शन करण्यात येईल.तसेच गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी या काळात पूर्ण प्रयत्न करु.असे पॅनल प्रमुख राजेंद्र ढाकणे  म्हणाले.

No comments:

Post a Comment