आजारी बेवारस महिलेला संजय कोठारी यांनी दवाखान्यात दाखल करून तीचे प्राण वाचवले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 27, 2021

आजारी बेवारस महिलेला संजय कोठारी यांनी दवाखान्यात दाखल करून तीचे प्राण वाचवले

आजारी बेवारस महिलेला संजय कोठारी यांनी दवाखान्यात दाखल करून तीचे प्राण वाचवले


नगरी दवंडी/प्रतिनिधी

जामखेड ःजामखेड दिनांक २७/२/२०२१ रोजी सकाळी आठ वाजता राहुल अहिरे सर यांचा सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोन आला एक बेवारस आजारी महिला रिक्षा स्टँड नगर रोड येथे पडलेली आहे तुम्ही ताबडतोब या यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले त्या महिलेची अवस्था फार वाईट होती अशा वृध्द महिलेला स्वतःच्या रुग्णवाहिकेत आणून सरकारी दवाखान्यात दाखल केले असता तेथील कर्मचाऱ्यांनी  ताबडतोब तिच्यावर उपचार चालू केले. यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले आतापर्यंत मी एस टी स्टँड वरून ५० ते ६० बेवारस स्त्री पुरुष वृद्ध आणून दवाखान्यात जमा केले आहेत म्हणजे याचा अर्थ कोणीतरी त्यांना आणून सोडून देत आहे त्याच्याकडे प्रशासनाने लक्ष घालावे. यावेळी पत्रकार यासीन शेख रिक्षाचालक अवि भुक्तर, पिनु मुळे, दीपचंद गुप्ता, किशोर वाकचौरे, राम यादव ,राम हगवणे ,शफिक शेख ,सिद्धार्थ पारवे, राहुल अहिरे सर ,अक्षय होडशिल, महेंद्र शिरसागर आदींनी मदत केली

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here