गुंडेगाव ग्रामपंचायतीमध्ये सत्तेची चावी हातात मिळताच कामांना सुरूवात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 25, 2021

गुंडेगाव ग्रामपंचायतीमध्ये सत्तेची चावी हातात मिळताच कामांना सुरूवात

 गुंडेगाव ग्रामपंचायतीमध्ये सत्तेची चावी हातात मिळताच कामांना सुरूवात

नगरी दवंडी/प्रतिनिधी

गुंडेगाव ः गुंडेगाव ग्रामपंचायत  निवडणूकीत रामेश्वर ग्रामविकास पॅनेल ची सत्ता येताच  नवनिर्वाचित संरपच सौ मंगल संकट, उपसंरपच संतोष भापकर याच्या उपस्थिती नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्याची  नुकतीच  मासिक मिटींग घेण्यात आली. अनेक कामांना प्राधान्य देत कोणतेही बजेट नसताना गावातील पाणि पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी एकमताने निर्णय घेऊन मा. लोकमुख ग्रा.सदस्य जनसेवक संतोष धावडे, सतिश काका चौधरी यांनी स्वत लक्ष घालून कामास प्रत्यक्षात आज सुरूवात केली. पुढील काळात लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आसून आरोग्य, स्वच्छता, पाणी या गोष्टीवर भर दिला जाईल आसे मत गुंडेगावचे उपसंरपच संतोष भापकर यांनी व्यक्त केले. भविष्यात पुढील विकास कामे स्वतः उभे राहून केले जातील आसे मत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संतोष धावडे व सतिश काका चौधरी, संतोष सकट यांनी व्यक्त केले आहे.  यावेळी जनसामान्यांच्या कामांची त्वरित दखल घेतल्या बद्दल  रामेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेखर हराळ , आधारस्तंभ संतोष कोतकर  यांनी आनंदाच्या भावना व्यक्त केल्या आसून पत्रकार संजय भापकर यांनी  संरपच, उपसंरपच, सदस्य यांचे आभार व्यक्त केले आहे. 



No comments:

Post a Comment