शिवजंयती पारंपारीक पध्दतीने गुंडेगाव येथे साजरी.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 20, 2021

शिवजंयती पारंपारीक पध्दतीने गुंडेगाव येथे साजरी..

 शिवजंयती पारंपारीक पध्दतीने गुंडेगाव येथे साजरी..

नगरी दवंडी/प्रतिनिधी 

गुंडेगाव :- चौकाचौकात लावलेले भगवे ध्वज, शाहिराच्या डफाचा घुमणारा आवाज, शिवरायांचा जयघोष अशा प्रेरणादायी वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त शुक्रवारी गुंडेगाव येथे  मानाचा मुजरा केला. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मिरवणुक टाळून चौकाचौकातील जयघोषामध्ये अबालवृध्द सहभागी झाले.गेले दोन दिवस गुंडेगाव  शिवजयंतीची जय्यत तयारी सुरू होती. मात्र या चार, पाच दिवसातच राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढल्याने साहजिकच प्रशासनाने दक्षतेची भूमिका जाहीर केली. त्यामुळे शिवभक्तांचा थोडा हिरमोड झाला. ठिकठिकाणी पोवाडे, मर्दानी खेळाचे आयोजन करण्यात आले होते.चौकाचौकात शिवपुतळ्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. भगव्या पताका वार्‍याबरोबर लहरत होत्या. रामेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने  गुंडेगाव चौकातील साठ फुटी उंच शिव स्तंभ  नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. कासारमळा चौकात स्वाभिमानी प्रतिष्ठान च्या वतीने  सकाळी 8 वाजता शिवजन्म सोहळा संपन्न झाला. यानंतर गुंडेगाव चौकातील रामेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात छत्रपती  शिवाजी महाराज प्रतिमेला पुष्पहार  मा.दादासाहेब दरेकर  आणि उपसंरपच संतोष भापकर ,  वाळकीचे संरपच शरद बोठे  यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी संरपच सौ.मंगल सकट , संतोष सकट,ग्रा.सदस्य  नानासाहेब हराळ, संतोष धावडे, राहुल चौधरी, भाऊसाहेब हराळ, सतिश चौधरी, एकनाथ कुताळ, युवा नेते संतोष कोतकर,गोरख माने,मा.उपसंरपच मंगेश हराळ, संभाजी जाधव, गणेश हराळ दुकानदार, डॉ. विलास सकट, रामकृष्ण कुताळ, प्रदिप भापकर, रोहिदास भापकर,किरण कोतकर, दादासाहेब आगळे, दादा जावळे,  संतोष जाधव, संदिप धावडे, पत्रकार संजय भापकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.                     

         तसेच रक्तदान शिबिराचे  आयोजन रामेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान च्या वतीने जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर   यांनाही पाचारण करण्यात आले होते. अनेकांनी रक्तदान केले . रामेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान चे अध्यक्ष शेखर हराळ,  भाऊसाहेब,  भापकर , यश चौधरी , तुकाराम भापकर , सचिन जाधव, गोकुळ पवार, विकास शिर्के,  भाऊसाहेब शिंदे , राहुल कुताळ,  सागर कासार , गोरख माने, कानिफनाथ सकट, ज्ञानेश्वर हराळ, तुषार जाधव,  शरद सकट , देवीदास पवार यांनी सहकार्‍यांसह कार्यक्रमाचे नियोजन केले.चिमुकल्यांचा अपार उत्साहसायकलीला फडफडणारा भगवा ध्वज.. त्याचप्रमाणे राज्यकर्ते ग्रुप चे अध्यक्ष  बळीराज शिंदे मार्गदर्शनाखाली  याच्या  कार्यकर्तेनी शिवछत्रपती महाराजांना अभिवादन करून  जयजयकार करत युवा शिवभक्त  सार्‍या गाव भर दिसत होती. शहर असो की गाव तिथे शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन झाले. भल्या पहाटेपासून स्वाभिमानी प्रतिष्ठान चे तरुण नगर येथून  शिवज्योत घेवून धावत गुंडेगाव  गावी आले . गावातील  ढोलपथकाने सकाळी  आपल्या वादन कौशल्याचे शानदार प्रदर्शन केले. या पथकाच्या युवा सदस्यांनी ढोल, ताशाच्या तालावर उपस्थितांना डोलायला लावले. अनेकांनी यावेळी या वादनाचे मोबाईवर चित्रीकरण करून घेतले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here