शासनाने शिक्षकांच्या वेदना समजावून घ्याव्यात ः शिंदे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, February 8, 2021

शासनाने शिक्षकांच्या वेदना समजावून घ्याव्यात ः शिंदे

 शासनाने शिक्षकांच्या वेदना समजावून घ्याव्यात ः शिंदे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कास्ट्राईब शिक्षक संघटना शहराध्यक्ष प्रसाद शिंदे यांच्या पुढाकारातुन आज अ.नगर जिल्ह्यातील शिक्षकांना वतीने दिनांक 29 जानेवारी 2021 पासून आझाद मैदान येथे सुरु असलेल्या अंदोलनाला मुंबईत जाऊन सक्रिय पाठिंबा दिला.
याप्रसंगी शिंदे यांनी माहिती दिली आहे की, 13सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार घोषीत अनुदान मंजुर 20%,व वाढीव 40% वेतन वितरणाचा आदेश प्रचलित धोरणाने तात्काळ काढावा तसेच सर्व अघोषित शाळा,कनिष्ठ महाविद्यालय निधीही घोषीत कराव्यात या मागणीसाठी हजारो शिक्षक आझाद मैदान जवाब दो बेमुदत धरणे आंदोलनात सात दिवसापासुन बसले आहेत.

मागील शासनाने 13,सप्टेंबर 2019 ला शासन आदेश काढून प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालयाना अनुदानासाठी घोषीत केले व 1एप्रिल2019 पासुन अनदान मंजूर केले तसेच सोबतच ज्या प्राथमिक,माध्यमिक  शाळा, 20% वेतन घेत होत्या त्यांना वाढीव 40% वेतन मंजुर केले,नंतर सत्तांतर झाले.व महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले या महाविकास आघाडी शासनाने पण दि.24 फेब्रुवारी 2020च्या बजेट अधिवेशनात वेतनासाठी लागणार्या निधीची पुरवणी सभागृहासमोर मंजुर केली,20वर्षापासुन विनावेतन वेठबिगाराच जीवन जाणा-या  शिक्षकांना हा निर्णय संजिवनी देणारा ठरला,परंतु लवकरच राज्यात कोवीड 19 चा कहर सुरु झाला, व शासनाने शिक्षकांचे मंजुर वेतन कोरणाचे कारण पुढे करत टाळले,या मुळे 20 वर्षापासून वेतनाची वाट पाहणार्या शिक्षकांचा पुन्हा भ्रमनिरास झाला,या धक्क्याने राज्यात कोविड काळात 29 विनाअनुदानित शिक्षकांनी आत्महत्या व हार्ट अट्याकने आपले प्राण सोडले, तरी शासनाला कदर आली नाही,या नंतर शासनाने वेळकाढूपणा करत मा.ना.बाळासाहेबजी थोरात यांच्या अध्यक्षतेखाली त्रुटी समिती नेमली,अर्थखात्याचे तपासणीचे अधिकार रद्द केले व शिक्षणखात्याला तपासणीचे अधिकार दिले,परंतु प्रचलित अनुदानाची मागणी समितीने केली होती ती मंत्रीमंडळाने नाकारली, 14आक्टोबर 2020 च्या कॅबिनेट ने 1 एप्रिल 2019 चे 20% व 40% वेतन हे 1नोव्हेबर पासुन देऊ केले,या मध्ये 19 महिन्याच्या वेतनाला कात्री लावण्याचे काम शासनाने केले,
13 सप्टेंबर 2019नुसार 146+1638 उच्च माध्यमिक शाळा, वर्ग तुकड्या व अतिरिक्त शाखा यांना 20% अनुदान मंजुर करण्यात आले, यावर 9884 शिक्षक व कर्मचारी कार्यरत असून 24 फेब्रुवारी 2020रोजी पुरवणी मागणी द्वारे निधीची तरतूद झालेली आहे मात्र 14 आक्टोंबर 2020 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत या शिक्षकांबरोबर धोका करत 19 महिन्याचा पगार कमी करत 1 एप्रिल 2019 ऐवजी 1नोव्हेंबर 2020 पासुन वेतन अनुदानाचा निर्णय मंत्रीमंडळात घेतला,पुरवणी मागणी मंजुर होण्याअगोदर तपासणी झालेली असताना पुन्हा तपासणीचा घाट घातला व 1 डिसेबंर 2020 ते 22 जानेवारी 2021 च्या दरम्यान सर्व महाराष्ट्रातील शाळा,कनिष्ठ महाविद्यालय पुन्हा मंत्रालयीन स्तरावरुन तपासणी पुर्ण केली,असुनही वेतन अनुदान वितरणाचा शासन आदेश निर्गमित करण्यास शासनाकडून विलंब केला जात आहे,13 सप्टेंबर 2019 नुसार, 20%अनुदान घेत असलेल्या प्राथमिक,माध्यमिक शाळांना 1 एप्रिल 2019 पासुन वाढीव 40% अनुदान देण्याचा निर्णय सुध्दा 14 आक्टोंबर 2020च्या मंत्रीमंडळाने बदलला व 1 नोव्हेंबर 2020 पासुन अनुदान मंजुर करुण यातही 19 महिन्याच्या पगाराला हरताळ फासण्यात काम शासणाने केले,यात 19 सप्टेंबर 2016 नुसार 20% मंजुर 1628 शाळा व 2452 वर्ग तुकड्या व 9 मे 2018 नुसार 779शाळा व वर्ग तुकड्या यांना 40% वाढीव अनुदान मंजुर केलेले आहे,तसेच प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सर्व स्तरातून तपासणी होऊन पुणे व मुंबई येथे घोषीत होण्यासाठी पोहचलेल्या आहेत त्यालाही शासनाने  तरतुदीसह घोषीत करण्यास विलंब करत आहे.
या सर्व प्राथमिक,माध्यमिक उच्च माध्यमिक,घोषीत अनुदान मंजुर 20% व 40% लागणार्‍या निधीचे टोकन टाकलेले आहे,तसा उल्लेख दि 1 डिसेंबर 2020 ला निर्गमित केलेल्या शासन निर्णयात केलेला आहे, बजेट अधिवेशन व मागील हिवाळी अधिवेशनात दोन सभागृहात शिक्षणखात्याकडून सांगितले गेले की जानेवारी महिन्यात या शिक्षकांच्या खात्यात पगार जमा केला जाईल परंतु सर्व तपासण्या पुर्ण झालेल्या असुन प्नशासकीय अधिकारी विनाकारण दिरंगाई करत आहे,सभागृहात सुध्दा शासन खोट बोलु शकते हे या वरुण सिध्द होत आहे,या 20% व वाढीव 40% शिक्षकांवर या पुरोगामी महाराष्ट्रात हा अन्याय होत आहे,हि लाजीरवाणी बाब आहे,यामुळे शसणा विषयी कमालीचा रोष या विनाअनुदानित शिक्षकांमधे निर्माण झाला आहे, तात्काळ
वरील मागण्या मंजुर करुण वेतन वितरणाचा आदेश प्रचलित धोरणाने निर्गमित करावा ,याच रास्त मागणीसाठी हे 45 हजार  शिक्षक की जे गेल्या 20 वर्षापासुन विनाअनुदानित काम करत आहेत,ते या शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 23 शिक्षक संघटना एकत्रीत येत सर्व शिक्षकांनी मिळुन आझाद मैदानात दि. 29 जानेवारी पासुन जवाब दो,बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत,अशी माहिती शिंदे यांनी दिली या बाबतीत अहमदनगर जिल्ह्यातील  कांतीलाल खुरंगे , समिर पठाण, राहूल मोरे , अनभुले सर, गावडे सर, नियाज शेख,आदि  शिक्षक पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर पोहचले आहे.कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here