जिल्हा बँकेच्या संचालकपदी आ.राजळे, राळेभात बिनविरोध - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 8, 2021

जिल्हा बँकेच्या संचालकपदी आ.राजळे, राळेभात बिनविरोध

 जिल्हा बँकेच्या संचालकपदी  आ.राजळे, राळेभात बिनविरोध

अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी आ.मोनिका राजळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. जामखेड विविध सेवा मतदार संघातून जगन्नाथ राळेभात बिनविरोध झाले आहेत.  याआधी जिल्हा बँकेवर माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के तसेच माजी आ.चंद्रशेखर घुले यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
राजळे यांनी अर्ज दाखल केलेल्या सेवा संस्था मतदारसंघातून इतर उमेदवारांनी आज अर्ज माघारी घेतले. त्यामुळे आ.राजळे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. आ.राजळे यांनी अर्ज दाखल करतानाच बिनविरोध निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला होता. सर्वाधिक ठराव आपल्या बाजूने असल्याने त्या निश्चिंत होत्या. आज इतर उमेदवारांच्या माघारीमुळे त्यांचा दावा प्रत्यक्षात उतरला आहे.
जिल्हा बँकेसाठी विकास सेवा संस्था मतदार संघातून राळेभात यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज भोसले यांनी मागे घेतला. त्यामुळे राळेभात बिनविरोध झाले आहेत.

No comments:

Post a Comment