आता नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 3, 2021

आता नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी

 आता नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी

अकोला, कर्जत, जामखेड, पारनेर, शेवगाव...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्यांमधील विविध जिल्ह्यात 95 नगरपरिषदा तसेच नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने संबंधित नगरपंचायत, नगर परिषदांना मतदान यादी प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहे.

या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, कर्जत,जामखेड, पारनेर, शेवगाव या नगरपरिषदेचा समावेश आहे. 15 फेब्रुवारी रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदान यादी प्रसिद्ध करणे तर 15 ते 22 फेब्रुवारी या काळात प्रारूप मतदान यादी वर हरकती व सूचना दाखल करण्याच्या तर 1 मार्च रोजी अंतिम प्रभाग निहाय मतदान यादी अधिप्रमाणित करून प्रसिद्ध  करणे आणि 8 मार्चला मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध करणे. तर मतदान केंद्रनिहाय मतदान यादी प्रसिद्ध करणे असा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने संबंधित नगरपंचायत, नगरपरिषद यांना दिले आहे.
मतदान याद्या प्रसिद्ध करताना निवडणूक आयोगाने मार्गदर्शन सूचना केल्या आहेत त्यामध्ये मतदान यादी प्रसिद्ध करताना दुबारा नाव वगळणे ,रहिवासी सोडून गेल्याची नावे वगळणे, विधानसभा निहाय मतदान आहेत किंवा नाही याची तपासणी करणे,  दुसर्‍या प्रभागातील मतदान चुकून अंतर्भूत झालेले, संबंधित प्रभागातील विधानसभा मतदान यादीत नाव असून संबंधित प्रभागाच्या मतदान यादीत नाव वगळण्यात आली  असल्यास अशा मतदारांची नावे समाविष्ट करणे आदी सह विविध सूचना नगरपंचायत, नगरपरिषद  यांना राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment