चर्मकार संघर्ष समितीची मागणी पोलीस अधिक्षक कार्यालयात निवेदन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 24, 2021

चर्मकार संघर्ष समितीची मागणी पोलीस अधिक्षक कार्यालयात निवेदन

 चर्मकार संघर्ष समितीची मागणी पोलीस अधिक्षक कार्यालयात निवेदन

जमीनीचा वाद मागे घेण्यासाठी शिवीगाळ करणार्‍यांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः केडगाव देवीच्या मागे असलेल्या 20 एकर जमीनीचा वाद न्यायप्रविष्ट असताना विरोधक खटला मागे घेण्यासाठी संतोष उत्तम त्रिंबके यांना धमकावून जातीवाचक शिवीगाळ करीत असल्याचा आरोप करुन, चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने त्रिंबके कुटुंबीयांना संरक्षण देण्यासह धमकावणार्यांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस अधिक्षक कार्यालयात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. चर्मकार समाजातील संतोष उत्तम त्रिंबके (रा. भवानीनगर, बुरूडगाव रोड) यांची वडीलोपर्जित जमिनीची 20 एकर क्षेत्र केडगाव देवीच्या मागे आहे. या जागेचा वाद अ‍ॅड.वसंत केशव पालवे व अ‍ॅड. प्रदीप केशव पालवे यांच्याविरोधात न्यायालयात सुरू आहे. परंतु वरील दोन्ही व्यक्ती मागील अनेक दिवसांपासून त्रिंबके व त्यांच्या कुटुंबियांना धमकावून संबंधित खटला मागे घेण्याकरिता दबाव आणत आहे. दि.21 फेब्रुवारी रोजी पालवे यांनी पाठविलेल्या सात ते आठ गुंड व्यक्तींनी संतोष त्र्यंबके यांच्या घरात जाऊन जातीवाचक शिवीगाळ केली. प्रकरण मागे न घेतल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संतोष त्रिंबके व त्यांच्या कुटुंबीयांना सदरील व्यक्तींकडून धोका निर्माण झाला आहे. तरी त्रिंबके कुटुंबीयांना संरक्षण द्यावे, खटला मागे घेण्यासाठी धमकावून शिवीगाळ करणार्यांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. संबंधीतांवर कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष उदमले, युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे, लक्ष्मण साळे, रावसाहेब कानडे, ज्ञानेश्वर म्हिसमाळे, संतोष त्रिंबके, उत्तम त्रिंबके, पांडुरंग त्रिंबके, राजू त्रिंबके आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment