छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा प्रोफेसर चौकात उभारण्याची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडे विनायक राजं प्रतिष्ठानची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 15, 2021

छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा प्रोफेसर चौकात उभारण्याची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडे विनायक राजं प्रतिष्ठानची मागणी

 छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा प्रोफेसर चौकात उभारण्याची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडे विनायक राजं प्रतिष्ठानची मागणी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा प्रोफेसर चौक येथे बसवण्यात यावा अशी मागणी गेल्या दहा वर्षापासून विनायक राजं प्रतिष्ठानने महापालिकाकडे केली आहे.ठराव मंजूर झाला असून याबाबत पुढे काहीही होत नाही.आपण यात स्वता लक्ष घालून या पुतळा लवकरात लवकर उभारावा या मागणीचे निवेदन विनायक राजं प्रतिष्ठानचे उपअध्यक्ष विनय वाखुरे पाटील यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.यावेळी विक्रम राठोड,संभाजी कदम,भाऊ कोरेगावकर, निलेश भाकरे उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे सदर विषय आम्ही गेल्या दहा वर्षांपासून महानगरपालिकेत पाठपुरावा करीत असून यातील नेमकी काय अडचण आहे हि आजपर्यंत महापालिकेने समोर आणलेली नाही.बदललेल्या नियमानुसार मुख्य चौकात येणारी कायदेशीर अडचणी लक्षात घेता प्रोफेसर चौकात असणार्‍या नाट्यगृहाच्या प्रवेश द्वार जवळ हा छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी आम्ही वारंवार करीत असून याचा ठराव मंजूर होऊन दहा वर्ष उलटलेली आहेत. या संबधीत मूर्तीकारची रक्कम हि पोहोच झाली आहे.तरी या विषयी मागीलवर्षी महापौरांना सदर विषयाचे पत्र मी माझ्या स्वताच्या रक्ताने लिहून देऊनही यावर कुठलीहि प्रगती केलेली नाही.तरी आपण या प्रकरणात तातडीने लक्ष घालून प्रलंबित असलेल्या परवानग्यां मिळवण्यासाठी महानगरपालिकेला आदेश देण्यात यावे. अशी मागणी सर्व शिवशंभू भक्तांच्या वतीने आपणांस करतो.निवेदन दिल्यावर एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी येथील नियोजन भवनच्या बैठकीत या विषय प्रथम घेऊन जिल्हाधिकारी यांना आदेश दिला कि याबाबत तत्काळ प्रस्ताव पाठवा त्याला लगेच मंजुरी दिली जाईल.

No comments:

Post a Comment