सुपा येथे जुळणार दिव्यांगाच्या रेशीमगाठी२० फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळावा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 19, 2021

सुपा येथे जुळणार दिव्यांगाच्या रेशीमगाठी२० फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळावा

 सुपा येथे जुळणार दिव्यांगाच्या रेशीमगाठी२० फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळावा

निलेश लंके अपंग बहुउद्देशीय कल्याणकारी संस्थेच्या वतीने आयोजन

आमदार निलेश लंके यांची सामाजिक संकल्पना

नगरी दवंडी

पारनेर/प्रतिनिधी :

-शारिरककृष्टया सक्षम असलेल्यांप्रमाणेच दिव्यांग तरूण तरूणी यांनाही जीवनसोबती असावेत. त्यांचा सुखाचा संसार फुलुन आयुष्यात आनंद बहरावा  या उद्देशाने निलेश लंके अपंग बहुउद्देशीय कल्याणकारी संस्था, निलेश लंके प्रतिष्ठान,निलेश लंके महिला कल्याणकारी संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार २० फेब्रुवारी रोजी सुपा येथील सफलता मंगला कार्यालयात सकाळी ९ ते  संध्याकाळी ६ या कालावधीत वधु वर सुचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या ठिकाणी अनेकांच्या रेशीम गाठी जुळणार असल्याचे  अपंग बहुउद्देशीय कल्याणकारी संस्थेचे सुनिल करंजुले यांनी सांगितले. आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून  हा सामाजिक उपक्रम राबवला जाणार आहे.

प्रत्येक व्यक्तीला धडधाकट जीवन जगण हव असत. परंतु काही दुर्देवाने जन्मताच विकलांग असतात. काहींना अपघातात अपंगत्व येते. नियतीने हिरावले तरी अनेक जण अपंगत्वावर मात करीत जीवनाशी संघर्ष करतात. त्यांच्या जिद्दीसमोर अनेकदा यश सुध्दा लोटांगण घालते. नाँर्मल व्यक्तींनाही लाजवेल असे काम दिव्यांग बांधव आणि भगिनी करतात. त्यांची जगण्याची उमेद अनेकांसमोर वस्तुपाठ ठेवते. अशा दिव्यांग व्यक्तींकरीता निलेश लंके अपंग बहुउद्देशीय कल्याणकारी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.यामाध्यमातून दिव्यांगांना मदतीचा हात दिला जातो. त्यांना विविध योजनाचा लाभ देण्याचे काम केले जात आहे. या सर्वांच्या समस्या अडचणींची सोडवणुक करण्याच्या अनुषंगाने संस्थेच्या वतीने प्रयत्न केले जातात. आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचा अतिशय प्रभावी काम सुरू आहे.त्याचाच एक भाग म्हणून   प्रतिकुल परिस्थिती अनुकल करण्याची धमक असलेल्या दिव्यांग  तरूण तरूणींच्या आयुष्यात सुध्दा आनंदाचे क्षण यावेत. त्यांची लग्नगाठ बांधवी ,सुखाचा संसार करावा या हेतुने दिव्यांग वधु वर सुचक मेळाव्याचे आयोजन सुपा या ठिकाणी करण्यात आले आहे.सफलता मंगल कार्यालयात वधु वर परिचयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हा मेळावा पुर्णपणे मोफत असून जेवणासह इतर सोयी सुविधा आयोजकांच्या वतीने दिल्या जाणार आहेत.यामध्ये राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना सहभागी होता येणार आहे.अधिक माहितीसाठी खालील  क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन निलेश लंके अपंग बहुउद्देशीय कल्याणकारी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

सुनिल करंजुले 9922481098

संतोष जाधव 9970071105

सुनिता वाळेकर 9284497344

राजु भुजबळ 9766712376

आप्पासाहेब ढोकने 9588488334

हमीद शेख 9766460280

सचिन पानमंद नाशिक 8108044454

उज्वला घोडके 8830806249

 

हे कागदपत्र आवश्यक

१)आधार कार्ड

२)अपंग प्रमाणपत्र

३) 2 पासपोर्ट साईज फोटो

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here