आधुनिक शिक्षणाकडे काळजीपुर्वक लक्ष दिले पाहिजे - खैरमोहंमद खान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 19, 2021

आधुनिक शिक्षणाकडे काळजीपुर्वक लक्ष दिले पाहिजे - खैरमोहंमद खान

 आधुनिक शिक्षणाकडे काळजीपुर्वक लक्ष दिले पाहिजे - खैरमोहंमद खान


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शिक्षणप्राप्त करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, परंतु आजच्या आधुनिक युगात शिक्षणाशिवाय पर्याय नाही, म्हणून प्रत्येकाने आधुनिक शिक्षणाकडे काळजीपुर्वक लक्ष दिलेच पाहिजे. आता प्रत्येक मदरशातसुद्धा अरबी शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित, इंग्रजी व संगणकाचे शिक्षण दिले जात आहे. ही जमेची बाजू असली तरी त्यापेक्षा उच्च शिक्षणावर लक्ष केंद्रीत करण्याचे शालेय विद्यार्थ्यांना महात्मा गांधी उर्दू स्कूलचे मुख्याध्यापक खैरमोहंमद खान यांनी आवाहन केले.
अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद व मखदुम सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उर्दू सप्ताहामध्ये छावणी परिषदेच्या महात्मा गांधी उर्दू स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन मानस प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल बेलपवार यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष शालेय समितीचे अध्यक्ष अकिल शेख हे होते.
याप्रसंगी अकिल शेख म्हणाले, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी शाळेच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात असतात. पारंपारिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यात येत आहे. त्याचबरोबर स्पर्धां परिक्षांचीही तयारी करुन घेण्यात येते, त्यामुळे विद्यार्थीही विविध परिक्षांमध्ये यश संपादन करत आहे.सूत्रसंचालन शेख मुबिना यांनी केले, प्रास्तविक शेख सुमय्या यांनी केले तर आभार अरविंद कुडिया यांनी केले.

No comments:

Post a Comment