अक्षत कांदोलकर ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये चमकला - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 5, 2021

अक्षत कांदोलकर ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये चमकला

 अक्षत कांदोलकर ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये चमकला


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अक्षत अमित कांदोलकर या सहा वर्षाच्या मुलाने सूर्यमालेविषयी ज्ञानाच्या जोरावर ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये नुकतेच नाव नोंदविले आहे. त्याने सूर्यमालेशी निगडीत 60 प्रश्नांची उत्तरे अवघ्या तीन मिनिट 40 सेकंदात देत हे रेकॉर्ड  स्वत:च्या नावे केले.अक्षत याने सूर्यमालेविषयी पुस्तक, ऑनलाईन व्हिडिओ व अवकाशाचे निरिक्षण अशा वेगवेगळ्या स्तरावरुन ज्ञान संपादन केले. या चिमुकल्याने ‘नन्हा ग्यान फाऊंडेशन’च्या फेसबुक पेजवर नुकतेच 30 मिनिटाचे व्याख्यान सुद्धा दिले आहे.अक्षत सध्या बचपन प्ले स्कूल या प्राथमिक शाळेत युकेजीमध्ये शिकत आहे. त्याच्या रेकॉर्डबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका मुस्कान सचदेव व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. अक्षतचे वडिल अमित कांदोलकर हे इन्फोसिस, पुणे येथे कार्यरत आहेत तर आई सीमा कांदोलकर या अहमदनगर जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here