छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र विचार आजच्या युवा पिढीला दिशा दर्शक ठरेल - नगरसेवक . डॉ. श्री. सागर बोरूडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 17, 2021

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र विचार आजच्या युवा पिढीला दिशा दर्शक ठरेल - नगरसेवक . डॉ. श्री. सागर बोरूडे

 छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र विचार आजच्या युवा पिढीला दिशा दर्शक ठरेल - नगरसेवक . डॉ. श्री. सागर बोरूडे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेवून रयतेचे राज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र विचार आजच्या युवा पिढीला दिशा दर्शक ठरेल असे कार्य उभे केले आहे. रयतेला गुलामगीरीतून मुक्त करण्यासाठी लढा उभाकेला. आणि हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले. त्यांच्या विचारांचा आदर्श घेवून मानवता सेवा संस्थेच्या माध्यमातून वर्षभर सामाजिक उपक्रम राबविले जातात. दिन दुबळयाची सेवा हिच ईश्वर सेवा मानून मुकबधीर व मतिमंद मुलांच्या शाळेच्या खोल्या बांधकामासाठी सिमेंट दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून सकारात्मक दृष्टिकोनातून मानव सेवेचा वसा हाती घेतला आहे. असे प्रतिपादन नगरसेवक मा.डॉ.श्री.सागर बोरूडे यांनी केले.
आठरे पाटील हायस्कूल जवळील मुकबधीर व मतिमंद मुलांच्या शाळा खोल्याच्या बांधकामासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून सिमेंटच्या गोण्या भेट देण्यात आल्या. यावेळी नगरसेवक डॉ.श्री.सागर बोरूडे , विरोधीपक्ष नेता मा.श्री.संपत बारस्कर, मा.श्रीमती रंजनाताई उर्किडे, मा.श्रीमती रेखाताई शिंदे, मा.श्री.पंकज भांबळ, मा.श्री.अक्षय बोरूडे, मा.श्री.गौरव बोरूडे, मा.श्री.आदित्य काकडे, प्रा.श्री.मच्छिंद्र म्हस्के, मा.श्री.प्रशांत जाधव आदि उपस्थित होते. विरोधीपक्ष नेता मा.श्री.संपत बारस्कर म्हणाले की, मानवता सेवा संस्थेचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जयंती औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासून मदत करण्याचे कार्य खूप मोठे आहे. दिन दुबळयांची सेवेचा वसा प्रत्येकाने अंगीकरावा त्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करावा असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment