जप्त वाहनांच्या लिलावातून नगर तहसीलला साडे चाळीस लाखांचा महसूल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 10, 2021

जप्त वाहनांच्या लिलावातून नगर तहसीलला साडे चाळीस लाखांचा महसूल

 जप्त वाहनांच्या  लिलावातून नगर तहसीलला साडे चाळीस लाखांचा महसूल 

स्लग - सहा वाहनचालकांनी तातडीने  भरला 15 लाख 20 हजारांचा दंड 



नगरी दवंडी / प्रतिनिधी 

अहमदनगर : नगर तहसीलच्या कार्यक्षेत्रात अवैध गौ फेण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्यानंतर ज्या वाहन मालकांनी दंडाची रक्कम भरण्यास असमर्थता दर्शवली अशा 22 वाहनांचा लिलाव बुधवारी ( दि. 10 )  नगर तहसील कार्यालय येथे करण्यात आला. यामधून 24 लाख रुपयांचा महसूल जमा झाला.

 या  लिलावासाठी एकूण 28 वाहनांबाबत उद्घोषणा प्रसिद्ध करण्यात आली होती, तसेच  याला व्यापक प्रसिद्धी सुद्धा देण्यात आली होती. यामुळे  सहा वाहन चालकांनी पंधरा लाख वीस हजार रुपये एका दिवसातच तहसील कार्यालयात जमा केले. उर्वरित 22 वाहनांचा लिलाव करण्यात आला ज्यातून एकूण 24 लाख रुपयांचा महसूल जमा झाला. असा  एकूण 40.47 लाख रुपयांचा महसूल लिलाव रूपाने जमा झाला. ही  लिलाव प्रक्रिया प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार उमेश पाटील, नायब तहसीलदार अभिजीत बारवकर,  गायके मॅडम, महसूल सहाय्यक इंगळे, महसूल सहाय्यक गायकवाड, शिपाई लहारे, कोतवाल आकाश करपे, देवेंद्र परदेशी आदी  महसूल कर्मचारी यांनी पार पाडला.


अवैध वाहतुकीला बसणार चाप -

 यावर्षी कोव्हीड -19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महसूल विभागाचे वसुलीचे लक्ष सुमारे दीडपट वाढवले आहे. त्यामुळे वसुलीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. अहमदनगर तहसील कार्यालयास एकूण 33 कोटी सहा लाख रुपयाचे वसुलीचे उद्दिष्ट दिल्यामुळे या उद्दिष्टपूर्तीसाठी वाहनांचा लिलाव हा एक मुख्य मार्ग म्हणून पुढे येत आहे. यामुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांना सुद्धा चाप बसत आहे.


...तर कारवाई यापुढेही -

 अवैध गौण खनिज वाहतूक करताना वाहने पकडली तर आलेल्या वाहनांवर अशाच प्रकारे लिलावाची कारवाई येत्या काही दिवसात केली जाणार असल्याचा  इशारा तहसीलदार उमेश पाटील यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment