किरण मुळे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
नगरी दवंडी/प्रतिनिधी
भिंगार ः नगर जलसंपदा विभागातील आरेखक किरण मुळे रा.भिंगार हे नुकतेच सेवानिवृत्त झाले.यानिमित्ताने भाजप नगरसेविका सौ शुभांगी साठे व सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कर्मचारी पतसंस्था अहमदनगरचे माजी चेअरमन व कलगीतुरा मंडळाचे अध्यक्ष सुनीलभाऊ कर्डिले यांनी त्यांचा सपत्नीक सत्कार केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले मुळे यांनी प्रामाणिकपणे नोकरी केली.ते शिस्तप्रिय असल्याने कामात सुसूत्रता होती.अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केले.
किरण मुळे अभ्यासू आहेत.नोकरी करत असतांना त्यांनी भिंगार वाचनालय देखील उत्तमप्रकारे सांभाळले.ते आता सेवा निवृत्त झाल्याने त्यांच्या सामाजिक कार्यात सहकार्य करु असे नगरसेविका शुभांगी साठे म्हणाल्या.
आपण माझा केलेला सन्मान म्हणजे एक पुरस्कारच आहे.सेवापूर्ती झाल्याने मी आता सामाजिक कार्यासाठी वेळ देईल असे सांगून सत्कार केल्याबद्दल मुळे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment