महाराजांचा इतिहास प्रेरणादायी : विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 22, 2021

महाराजांचा इतिहास प्रेरणादायी : विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर

 महाराजांचा इतिहास प्रेरणादायी : विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने विविध उपक्रमाने शिवजयंती साजरी...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
सण-उत्सव, वाढदिवस साजरे करीत असताना प्रत्येकाने आपल्या संस्कृतीचे जतन करावे व छत्रपतींचे विचार अंगीकारावे. महाराजांचा इतिहास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. युवकांनी सकारात्मक दृष्टीकोनातून आपले उत्सव साजरे करीत असताना सामाजिक बांधिलकी जोपासावी. गरजूंपर्यंत मदतीचा हात देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करावा, असे प्रतिपादन मनपा विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर यांनी केले.
एमआयडीसी येथील बालगृहातील विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने देण्यात आले. यावेळी विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरूडे, राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेसचे शहर उपाध्यक्ष तन्मय शिंदे, मच्छिंद्र नवघरे, महेश जाधव, सुमित सप्रे आदी उपस्थित होते. डॉ. सागर बोरुडे म्हणाले की, आजच्या युवकांना खर्‍या अर्थाने छत्रपतींच्या विचाराची खरी गरज आहे. सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी छत्रपतींचा इतिहास प्रबोधनाच्या माध्यमातून समाजासमोर मांडावा. जनतेमध्ये सामाजिक उपक्रम राबवून युवकांमध्ये एक आदर्श निर्माण करावा, असे ते म्हणाले. यावेळी बोलताना तन्मय शिंदे म्हणाले की, राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेसच्यावतीने शिवजयंतीचे औचित्य साधून बालगृहातील विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. 

No comments:

Post a Comment