खुनाच्या तपासातील हलगर्जीपणा भोवला पोलीस निरीक्षक निलंबित - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, February 8, 2021

खुनाच्या तपासातील हलगर्जीपणा भोवला पोलीस निरीक्षक निलंबित

 खुनाच्या तपासातील हलगर्जीपणा भोवला पोलीस निरीक्षक निलंबित


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2017 मध्ये गणेश काळे  या इसमाच्या खुनाच्या तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी भिंगार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांना निलंबित केले आहे.

तत्कालीन पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी या प्रकरणातील आरोपी 302 सारख्या गंभीर गुन्ह्याच्या शिक्षेस पात्र आहेत असा अहवाल दिला होता. एक वर्ष हा अहवाल पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी कुठलीही कारवाई न करता हा गुन्हा पेंडिंग ठेवला. त्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलीस ठाण्याला भेट दिली असता त्यांना हा गुन्हा अकस्मात मृत्यूच्या नोंदीमध्ये नोंद असल्याचा दिसला. या प्रकरणात भिंगार पोलीस ठाण्यामध्ये आकस्मात मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर तब्बल तीन वर्षांनी या प्रकरणातील रमेश काळे याचा वैद्यकीय अहवाल पोलिसांना प्राप्त झाला होता. त्या अहवालात सदरचा मृत्यू हा इथेनॉलची दारू आणि मारहाणीमुळे झाल्या असल्याचे स्पष्ट झाले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here