भावाच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, February 22, 2021

भावाच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या!

 भावाच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या!

घरगुती भांडणाला ‘ती’ वैतागली...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नवरा रोजच भांडण करतो यामूळे वैतागलेल्या पत्नीने भावाच्या मदतीने पतीचा कायमचा काटा काढला. काल रात्री संतोष दत्तात्रय मोरे (वय 45, रा. वाळुंज फाटा) व त्याची पत्नी सौ प्रियंका या दोघांमध्ये भांडणे सुरू झाली. प्रियंकाचा भाऊ रामेश्वर ही काल बहिणीला भेटायला आला होता. प्रियंका व रामेश्वर यांनी संतोष यास अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. नगर तालुका पोलिसांनी प्रियंका व रामेश्वर यांचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संतोष याची पत्नी प्रियंका आणि प्रियंकाच्या भाऊ रामेश्वर विठ्ठल दशवंत यांना अटक केली आहे. ही धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील वाळुज फाटा शिवरात रविवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. संतोष दत्तात्रय मोरे (वय 42 रा. वाळूज फाटा) असे मयताचे नाव आहे. या घटनेनंतर नगर तालुका पोलिसांनी
या घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार रविवारी प्रियंका तिच्या भाऊ रामेश्वर हा तिच्या घरी आला होता रात्री संतोष आणि प्रियांका यांचे भांडण सुरू झाले. यावेळी रामेश्वर आणि प्रियंकाने संतोष याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून रामेश्वर याने संतोष याच्या डोक्यावर कुर्‍हाडीच्या तुंब्याने मारहाण केल्याने संतोष याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती नगर तालुका पोलिसांना मिळताच नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
सानप यांनी प्रियांकाकडे विचारपूस केली असता रात्री भडणात पाय घसरून पडल्याने संतोष याचा मृत्यू झाल्याचा बनाव तिने केला. प्रियंकाच्या बोलण्यातही विसंगती जाणवल्याने सानप यांनी तिची कसून चौकशी केली तेव्हा तिने घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान संतोष याचा खून करून रामेश्वर रात्रीच प्रसार झाला होता सानप यांच्या पथकाने रविवारी दुपारी त्याला तहाराबाद येथून अटक केली. या प्रकरणी मयत संतोषच्या चुलत भाऊ संदीप सोपान मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघा आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here